mahatma-jyotiba-fule-jayanti: महात्मा फुले जयंती पर्वावर अकोला महानगरात प्रथमच निघाली विराट शोभायात्रा; सजीव देखाव्यांनी लक्ष वेधले




ठळक मुद्दे 

*विविध देखावे व शिवकालीन देखाव्यांनी दुमदुमले महानगर


*सकल माळी समाज व अनेक संघटनांचा सहभाग





भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पावन जयंती पर्वावर मंगळवारी महानगरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महात्मा फुले फेट्यांनी व शिवकालीन देखावाने महानगर जल्लोषपूर्ण झाले. 





या विराट शोभायात्रेचा प्रारंभ सिटी कोतवाली परिसरातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यावेळी माजी आ. लक्ष्मणराव तायडे, आमदार रणधीर सावरकर, माजी आ. तुकाराम बिरकड, माजी आ. बळीराम सिरस्कार, प्रा.डॉ. संतोष  हुशे, ॲड. महेश गणगणे, काँगेस नेते साजिद खान पठाण,डॉक्टर प्रशांत वानखेडे, प्रशांत गावंडे, माजी महापौर अर्चना मसने, माजी उप महापौर निखिलेश दिवेकर, राधा बिरकड,  राजेश राऊत, मनीष हिवराळे, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती उत्सव शोभायात्रा समितीचे  मार्गदर्शक प्रकाश तायडे, सुभाष सातव, जयंत मसने, शत्रुघ्न बिरकड, संजय गोटफोडे, शोभायात्रा समितीचे अध्यक्ष प्रकाश दाते, कार्याध्यक्ष अक्षय  नागापुरे, स्वागताध्यक्ष आशिष ढोमणे, महासचिव प्रवीण वाघमारे, उपाध्यक्ष उमेश मसने, क्रांतीज्योती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. नरेंद्र बेलसरे, लक्ष्मण निखाडे, दीपक बोचरे, प्रवीण तायडे, रामदास खंडारे, राजू वरोकार, सुनील उंबरकर, गणेश काळपांडे, कोषाध्यक्ष डॉ नितीन देवळकर,सचिव अशोक रहाटे, सुनील जाधव, महेंद्र काळे, योगेश रहाटे, उज्वल उगले, विजय इंगळे, बंडू क्षीरसागर, संजय तळस, गणेश म्हैसणे, प्रा श्रीराम पालकर, मनोहर उगले,अमोल नावकार, योगेश धनोकार, गजानन नवकार, ऋषिकेश आमले, संदीप शिवलकर, सुरेश कलोरे, मंगेश घोडे, बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष अनिल शिंदे, गजानन वाघमारे, संतोष सरोदे, अवधूत खडसे, आत्माराम मात्रे, गणेश पळसकर, राजू अंभोरे, दिलीप कणखर, अनिल पटेल, दिलीप सुलताने, दिलीप पुसदकर,गणेश वळतकर, संतोष जाधव, आकाश कवडे ,सोनू उज्जैनकर, दिलीप कणखर, प्रशांत भटकर आदी उपस्थित होते. 



सर्व जाती धर्मासह राजकीय पक्ष एकत्र 



अकोला च्या परंपरेनुसार या शोभा यात्रेत सुध्दा सर्व जाती धर्मसह राजकीय पक्षाचे नेते एकाच मंचावर आले होते.यावेळी आमदार सावरकर आणि साजीद खान पठाण यांची समयोचीत भाषण झाली. आमदार सावरकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून शोभा यात्रेस प्रारंभ झाला.





महात्मा फुले यांच्या पूजनानंतर या शोभायात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला.भव्य आतिषबाजी, लेझीम पथक व विविध झाक्या व देखाव्यांच्या समवेत व ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा प्रारंभ झाली. वाटेत अनेक संस्था संघटनांनी या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले. गांधी चौक येथे प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या वतीने जल वितरित करण्यात आले. याठिकाणी आकर्षक देखावा उभारण्यात आला होता. 


मनपा चौक परिसरात या शोभायात्रेचे ब्राह्मण समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह परिसरात या शोभायात्रेचे काँग्रेस कमिटीच्या वतीने उस्फूर्त स्वागत करण्यात आले. 



शोभायात्रा धिंग्रा चौक मार्गे अशोक वाटिका येथे येऊन या  शोभायात्रेचा डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमापूजनाने समारोप करण्यात आला.



दरम्यान या शोभायात्रेत महानगरातील अनेक बहुजन समाजातील  संस्था, संघटना व मंडळांनी आपल्या झाक्यासमवेत सहभाग घेत जल्लोष निर्माण केला. महिला युवतीनी पारंपारिक फेटे बांधून यात सहभाग घेतला तर पुरुष मंडळींनी ज्योतिबा फेटे बांधून एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज व ज्योतिबा यांच्या झाकीने लक्ष वेधले तर शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याही झाक्या आकर्षणाचे केंद्र ठरल्यात. बंजारा नृत्य लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत सहभागी झालेल्या युवती मंडळांनी आकर्षक नृत्य करीत जल्लोष निर्माण केला तर युवा वर्गाने ही सामूहिक नृत्य करून महात्मा ज्योतिबा फुले यांना आगळीवेगळी आदरांजली वाहली. 




शोभायात्रेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती, माळी युवा संघटन, क्षत्रिय माळी परिषद, फुले बिग्रेड, सत्यशोधक संघ, सावता संग्राम परिषद, मराठा सेवा संघ,महात्मा फुले युवक संघटन, अ. भा. ब्राह्मण महासंघ, समता पर्व, फुलमाळी संघटना, वनमाळी संघटना, समता परिषद, मुख्याध्यापक संघ, परीट समाज, चर्मकार, नाभिक, मणियार, कुणबी, सोनार, बौद्ध, धनगर, वंजारी, गुरव, सुतार, कुंभार, गाडी लोहार, भटके विमुक्त जाती, जमाती, बारी समाज, भोई समाज समवेत ओबीसी समाजातील सर्व बारा बलुतेदार संघटनेचे पदाधिकारी, नागरिक युवक,युवती, महिला पुरुष मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते.



विविध नेत्यांनी शोभायात्रेचे केले स्वागत 

यात माजी आ.गोपीकिशन बाजोरिया, माजी आ. हरिदास भदे,आ अमोल मिटकरी, महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, संग्राम गावंडे,  वंचितचे अध्यक्ष प्रमोद देंडवे, शिवसेनेचे राजेश मिश्रा,साजिद खान पठाण,माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, जि प सदस्य शंकरराव इंगळे, माजी जि प सदस्य प्रा सुरेश पाटकर, प्रतिभा अवचार, रमाकांत खेतान, अविनाश देशमुख, डॉ अमोल रावणकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूजा काळे आदी यावेळी उपस्थित होते.


समाजाच्या महिला विभागाने शोभायात्रेत घेतला सहभाग 



समाजाच्या माया इरतकर, ज्योती गाडगे,भारती शेंडे, वनिता राऊत, सुमित्रा निखाडे, माधुरी दाते, मायाताई काळपांडे,लीना देऊळकर, सारिका उगले,विद्या जवके, संध्या देशकर समेंत शेकडो महिला यामध्ये सहभागी होत्या.




जिल्हा प्रशासनातील पोलीस अधीक्षक संदीप घुगे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, जि प चे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार कार्यकारी अभियंता गणोरकर आदी ने या शोभायात्रेस शुभेच्छा दिल्या.



वंचितच्या वतीने अभिवादन 


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गांधी रोडवर महात्मा फुले जयंती उत्सव समितीचे स्वागत केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महानगर अध्यक्ष शंकराव इंगळे, क्रांतीज्योती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड.नरेंद्र बेलसरे, ॲड. विक्रम तानकर. ॲड. आकाश भगत,  पराग गवई, पुरुषोत्तम वानखडे, निरंजन बनसोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. आणि शोभायात्रातील कार्यकर्त्यांना शरबतचे वाटप केले. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्राध्यापक संतोष हुशे यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.



टिप्पण्या