unseasonal-rain-loss-of-crops: पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका; 3 हजार 447 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान






भारतीय अलंकार 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जिल्ह्यात 16 ते 18 मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीच नुकसान झालं आहे.तर आतापर्यंत प्राप्त अहवालानुसार सुमारे 3 हजार 447 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.यामध्ये गहू , हरभरा , भाजीपाला  आणि फलबागचा समावेश आहे. 



पातूर तालुक्यात काही जनावरे सुद्धा या गारपिटीने दगावली आहे.तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.मात्र कालही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.



जिल्ह्यात सर्वाधिक फटका पातूर, बार्शीटाकळी व तेल्हारा तालुक्याला या अवकाळी पावसासह गारांचा वर्षावचा झाला असून, त्यामुळे तब्बल 3 हजार 447 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.जुनी पेन्शन करिता शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू असल्याने सध्या पंचनामे रखडले आहे.




सध्या नुकसानग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी पाहणी केली असली तरी, कागदोपत्री काहीच अहवाल घेतला नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 1 हजार 184 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.




तालुका आणि बाधित क्षेत्र 



तेल्हारा 1200 हेक्टर

पातूर 2093 हेक्टर

बार्शीटाकळी 154हेक्टर

टिप्पण्या