proton academy akola city: प्रोटॉन अकादमी गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण




प्रा. नावेद हनिफ, प्रा. रेखा सारडा पत्रकार परिषदेत संबोधित करताना 




भारतीय अलंकार 24  

अकोला: श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनिअर्स किंवा असे इतर स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालक लाखों रुपये खर्च करतात.  मात्र सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी हुशार असूनही डॉक्टर, इंजिनिअर्स सारखे स्वप्न केवळ  मोठया खर्चामुळे पूर्ण करू शकत नाही. अश्या विद्यार्थ्यांना प्रोटॉन एकेडमी एक मोठा आशेचा किरण ठरत आहे. कारण या एकेडमी मार्फत सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची हुशारी शोधून काढत त्यांना कमी खर्चात त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी मदत करत आहे, अशी माहिती प्रोटॉन एकेडमीचे संचालक प्रा. नावेद हनीफ यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.



 

गरजू, आर्थिक विपणंवस्थेत आसलेल्या  कुटुंबातील होतकरू विद्यार्थी  डॉकटर , इंजिनिअर्स बनण्याचे स्वप्न पाहतात मात्र आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याने ते विद्यार्थी आपल्या स्वप्नांना दाबून टाकत इतर शिक्षण घेतात आणि बेरोजगारांची संख्या वाढवत असतात. परंतु अश्या  विद्यार्थ्यांसाठी प्रा. नावेद यांनी सुरू केलेली प्रोटॉन एकेडमी आता आशेचा किरण बनत आहे. 





प्रोटॉन एकेडमीने नुकतीच प्रोटॉन टॅलेंट सर्च परीक्षा घेतली. त्यामध्ये  सर्वसामान्य कुटुंबातील एकूण ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.  या स्पर्धेत  शाळांनीही सहयोग देत आपल्या शाळेतच ही परीक्षा घेतली. या स्पर्धेत सहभागी आणि पहिल्या तीन मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब आणि स्मार्ट वॉच वाटप 29 जानेवारीला करण्यात आले. 




यामध्ये पहिल्या 49 मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना एकेडमी मध्ये प्रवेश घेण्यासाठी काही टक्केवारीची सूट देण्यात आली आहे. तसेच १५ मार्च पासून सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महिना करिता मोफत फाउंडेशन कोर्स उपलब्ध राहणार आहे .त्यामुळे प्रोटॉन एकेडमी हुशार व गरजू विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणारी ठरणार असल्याचे प्रा. नावेद यांनी सांगितले. 






पत्रकार परिषदेत प्रा.रेखा सारडा, प्रा. जुनेद, वीरेंद्र ठाकूर आदी उपस्थित होते.


टिप्पण्या