Republic Day 2023 Akola mh: प्रजासत्ताक दिन उत्साहात: ध्वजवंदन, संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भारावले अकोलेकर





भारतीय अलंकार 24

अकोला: भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. येथील लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे हा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. या सोहळ्यात झालेले ध्वजवंदन, पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर झालेले शानदार संचलन आणि देशभक्ती व राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उपस्थित अकोलेकर भारावले.




मुख्य शासकीय सोहळ्यात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक गोकुलराज यांच्या नेतृत्वात व पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलन करण्यात आले. त्यात विविध सुरक्षा व सेवा पथकांनी सहभाग घेतला. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध नृत्य व सांघिक कवायती सादर केल्या.




या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष  संगिता अढाऊ,  विधान परिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षक डॉ. मिनाक्षी गजभिये, अति, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ, निलेश अपार, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार तसेच विविध विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, शहिदांचे कुटुंबिय, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.




निलेश गाडगे आणि किशोर बळी यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.


विविध पुरस्कारांचे वितरण




कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरणही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये ई-चावडी ऑनलाईन मोहिम उत्कृष्ट कामगिरी -अकोला तहसिल कार्यालय, जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण कमी केल्याबद्दल - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे,

संगणक मित्र तलाठी पुरस्कार- प्रसाद रानडे, वृक्षरोपण चळवळ व स्वस्तिक पॅटर्न यशस्वी राबविल्याबाबत – वृक्षप्रेमी नाथन, पूर्व प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य गणुवत्ता यादीत गुणवंता प्राप्त विद्यार्थी-

संस्कृती विनायक पाठक(बालशिवाजी माध्यमिक शाळा),आदित्य भविष्य गुरुदासानी (प्रभात किड्स स्कुल) यांचा समावेश आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन  मानवंदना देण्यात आली. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी उपस्थितांना तंबाखु व्यसनमुक्तीची शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.



टिप्पण्या