- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार 24
अकोला : महाराष्ट्राच्या गृह विभागाने बुधवारी 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त म्हणून नियुक्ती केली.
राज्य सरकारने प्रथमच विशेष मुंबई पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी, देवेन भारती यांना यापूर्वी मुंबई पोलिस, कायदा व सुव्यवस्था, जॉइंट कमिशनर, जॉइंट सीपी, ईओडब्ल्यू आणि अतिरिक्त सीपी क्राइम ब्रँच या पदावर नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही होते. सुरुवातीच्या काळात देवेन भारती हे अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक राहिले आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 13 डिसेंबर रोजी भारती यांच्या जागी सह आयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा