rampcon2022 exhibition akola: 'बांधकाम व आंतरिक सज्जा' विशेष तांत्रिक व्याख्यानास श्रोत्यांनी लावली हजेरी

रॅम्पकॉन प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस



भारतीय अलंकार 24

अकोला-असोशिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स अकोला शाखा यांच्या वतीने व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचर अकोला यांच्या सहकार्याने मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या मैदान येथे आयोजित तीन दिवसीय रॅम्पकॉन प्रदर्शनीत सुरू असलेल्या बांधकाम व आंतरिक सज्जा विश्वातील तज्ञाच्या विशेष तांत्रिक व्याख्यानास श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी,अभियंते व आंतरिक सज्जाचे विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहत आहे. दरम्यान शनिवारी प्रदर्शनीत सकाळी आर्किटेक्ट निधी चोपडे,यांचे  डिजिटल आर्किटेक्चर या आजच्या आधुनिक काळातील आंतरिक गृहरचना व साजसज्जेवर आधारित व्याख्यान संपन्न झाले.





यात चोपडे यांनी विविध डिजिटल आंतरिक गृहसजावटचे प्रकार कथन करीत पूर्ण माहिती सादर केली.तर दुपारी सांडपाण्याचे विकेंद्रीकरण या विषयावर अभियंता ललित बाजारे,पुणे यांनी आपले व्याख्यान दिले.वेस्ट वाटरचे विकेंद्रीकरण कसे करावे याची तांत्रिक माहिती बाजारे यांनी यावेळी सादर केली.या तांत्रिक सत्राचा समारोप स्मार्ट शहरे नवविकास या विषयावर आर्कि जितेंद्र मेहता,इंदोर यांनी व्याख्यान सादर केले.




या व्याख्यानात त्यांनी विकसित झालेल्या इंदोर महानगराचा रोड मॅप सादर करीत स्मार्ट शहराची परिभाषा प्रतिपादित केली.


यावेळी माजी पालकमंत्री डॉ रणजित पाटील उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत पंकज कोठारी व सुमित अग्रवाल,आर्कि जगदीश काबरा, मनिश भुतडा,ईश्वर आनंदानी,निलेश मालपाणी,संजीव जैन, आयुष गुप्ता यांनी केले.यात शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय,मानव अभियांत्रिकी महाविद्यालय व अन्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या शिबिराचा लाभ घेतला.





आज होणारी व्याख्यान 


आज रविवार दि 25 डिसेंबर रोजी स 11-30 वा तांत्रिक व्याख्यान सत्रात समृद्धी महामार्ग ओव्हर व्यु चॅलेंज व आचिवमेंट यावर नरेंद्र कावरे नागपूर,दु 2 वाजता मॉर्डन मॅपिंग टेक्निक यावर रोहित माने नागपूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.


अभिनव उपक्रमाचे स्वागत 


दरम्यान प्रदर्शनी स्थळी शेकडो नागरिकांनी विविध स्टॉल्सला भेटी देत या अभिनव उपक्रमाचे स्वागत केले.अनेक शहरातून उद्योजक व व्यापाऱ्यांनी या प्रदर्शनीत आपली उपस्थिती दर्शवून विविध ज्ञानाचा लाभ घेतला. प्रदर्शनीत नागरिकांच्या गृह संदर्भात विविध अडचणी व शंकांचे निरसन करण्यासाठी मोफत सल्ला केंद्र सुरू आहेत. या स्टॉल्सवर अभिजित परांजपे, इस्माईल कुरेशी, श्याम साधवाणी, रिझवन कुरेशी,कपिल ठक्कर,चंद्रशेखर मुखेडकर, शिवाजी भोरे, पंकज भटकर, श्रीकांत धानोकार, आयुष गुप्ता,इंद्रनील देशमुख हे मोफत सल्ला देत आहेत. 





नागरिकांनी एसीसीईच्या या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन एसीसीईचे अध्यक्ष पंकज कोठारी,आर्किटेक्चर असो.चे अध्यक्ष सुमित अग्रवाल,प्रकल्प समन्वयक अनुराग अग्रवाल,एसीसीईचे सचिव इस्माईल नजमी, कोषाध्यक्ष शेखर मुखेडकर,आर्किटेक असो.चे सचिव कमलेश कृपलानी,कोषाध्यक्ष वैभव शाह, सर्वेश केला, राजेश लोहिया, कपिल ठक्कर, संजय भगत, नरेश पाटील, रीजवन कुरेशी, निलेश मालपाणी, इंद्रनील देशमुख आदींनी केले.







टिप्पण्या