- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
mini-olympic-game-mh-state: महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा मशालीचे अकोल्यात जंगी स्वागत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची क्रीडा ज्योत मशाल अमरावती येथून निघुन शुक्रवारी अकोला जिल्हयात आगमन झाले. प्रथम मूर्तिजापूर शहर येथे क्रीडाप्रेमींनी स्वागत केले. मूर्तिजापूर येथून मशाल अकोला शहरात दुपारी पोहचली. यावेळी क्रीडाज्योत मशाल रॅलीचे अकोलेकर क्रीडाप्रेमींनी जोरदार स्वागत केले.
मान्यवरांनी केले स्वागत
मशाल चमुचे स्वागत माजी आमदार तुकाराम बिरकड, शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शत्रुघ्न बिरकड, अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतिश भट्ट, बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, धर्नुविद्या चम्पीयनशिप सुवर्ण पदक विजेता मानव जाधव, युथ चॅम्पियन सुवर्ण पदक विजेता मिहीर अपार यांनी केले.
समारोप प्रसंगी चित्रपट दिग्दर्शन नीलेश जळमकर, राजेंद्र, जळमकर, आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक धर्नुविद्या चंद्रकांत इंगले, बुढन गाडेकर, अनिल मालगे, शिवाजी चव्हाण, प्रणव बहादुरे, धीरज चव्हाण आदी सह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कर्मचारीवृंद, खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिवाजी चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे यानी केले.
अशी निघाली मशाल रॅली
वसंत देसाई क्रीडांगण येथून रॅलीला सुरुवात होवुन संतोषी माता मंदिर चौक, रामदास पेठ पोलिस स्टेशन समोरून पुढे रेल्वे स्टेशन चौक मार्गक्रमण करीत जिल्हा न्यायालय, आगरकर विद्यालय समोरून वसंत देसाई क्रीडांगण येथे परतली.
रायगडाला मशाल समर्पित
ही मशाल रॅली अकोला येथून निघून शेगाव मार्ग खामगाव, सिंदखेड राजा येथून पुणे येथे जाणार आहे. यानंतर रायगड किल्ल्यावर पोहचून ज्योत समर्पित होणार आहे.
सात जिल्हयात होणार स्पर्धा
मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रातील एकूण ७ जिल्हात होत असून, यामध्ये ३९ क्रीडा प्रकार व १०, ४५६ खेळाडू व मार्गदर्शक सहभागी होत आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा