wine-and-beer-bars-closed-protest: बार संचालकावर प्राणघातक हल्ला निषेधार्थ अकोल्यातील सर्व वाइन व बियर बार बंद राहणार!


      




ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गीता नगर येथील हॉटेल न्यु नितीन बारचे संचालक नितीन शहाकार यांच्यावर 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्यात ते गंभीर जखमी झालेत. हल्लेखोरावर कडक कारवाई व्हावी, याकरीता जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व उत्पादन शुल्कच्या अधीक्षक यांना बार मालक व संचालकांनी गुरुवारी  निवेदन दिले आहे.  त्यामधे या घटनेचा निषेध म्हणुन एक दिवस आ अकोला जिल्ह्यातील  सर्व बार बंद ठेवण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतलेला आहे. निर्णयानुसार उद्या शुक्रवार 28 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व बार या घटनेचा निषेध म्हणुन बंद ठेवण्यात येणार असल्याचे अकोला जिल्हा वाईन व बियर बार असोसिएशनने कळविले आहे.


दरम्यान या हल्याच्या निषेधार्थ आज 27 ऑक्टोबर रोजी असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यकडे निवेदन दिले. तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्ह्यवी,अशी मागणी करण्यात आली आहे. 26 ऑक्टोबर रोजी न्यू नितीन बारचे संचालक नितीन शाहकार यांचेवर बारमध्ये काही कुख्यात गुंडानी प्राणघातक हल्ला केला. तसेच बार मालकाला खंडणीची मागणी केली व त्यानंतर आयकॉन हॉस्पीटलमध्ये येवून आय.सी.यु. मध्ये जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आरोपींवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी असोसिएशनने केली आहे.




26 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजताचे सुमारास नितीन वाईन बारचे संचालक  नितीन शाहाकार यांचेवर  बारमध्ये ग्राहक म्हणुन आलेले गुंड प्रवृत्तीचे 4 ते 5 लोकांनी बार काउंटरवर बसलेले संचालक यांना कुठल्याही प्रकारचे बील न देता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला व मारहाण करून खंडणीची मागणी केलेली आहे. त्याबबत रीतसर तक्रार जुने शहर पोलीस स्टेशनला  दिलेली आहे व  हल्यामध्ये जखमी संचालक यांना आयकॉन हॉस्पीटलमध्ये आय.सी.यू. मध्ये अडमीट केलेले आहे व त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. संचालक यांना  गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी व त्यांच्या साथीदारानी हॉस्पीटलमध्ये येवून जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे. दिलेला असल्यास रीपोर्ट मागे घ्या अन्यथा, यावेळेस प्राण वाचले पुढच्या वेळेस प्राण वाचणार नाही. अशी धमकी देवून गेलेले आहे. त्या संबंधीसुध्दा रामदासपेठ पोलीस स्टेशनला रात्री तकार दाखल केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


घटनेची प्राणघातक हल्याबाबत आरोपीचे नावासह तकार दिलेली आहे. आरोपी यांचे विरोधात अनेक गुन्हे दाखल असून,  आरोपी हा स-हाईत गुन्हेगार आहे. बरेचदा ते जेलमध्ये सुध्दा जावून आलेले आहेत. त्यामुळे आरोपी हे केव्हाही, कधीही प्राणघातक हल्ला करू शकतात व त्यामुळे  बार मालकांवर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.  आरोपी हे अकोल्यातील अनेक बारमध्ये जावून दहशत फैलविण्याचे काम करीत असतात. अशा गुंड आरोपीमुळे आकोल्यातील बार चालकांना बार चालवितांना अनेकदा अडचणी व धमक्या मिळत असतात पण, व्यवसायामुळे वारंवार तक्रार करण्याचे बार मालक टाळतात,असे निवेदनात नमूद केलेले आहे.


बार मालकांवर प्राणघातक हल्ला, घातपात व खंडणी मागणे हे प्रकार वाढत असून,  बारमालकांना आता व्यवसाय करतांना जीवाला धोका निर्माण झालेला असल्याने घटनेचा निषेध म्हणुन  28 ऑक्टोबर रोजी एक दिवस सर्व बार बंद ठेवून निषेध करणार आहे. तसेच आरोपींवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावे,  अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वात देण्यात आले.उपाध्यक्ष अतुल पवनीकर,सचिव राजेश गोसावी, कोषाध्यक्ष गजानन तायडे, सचिव निखिल राऊत, सिमांत तायडे दिलीप म्हैसने, सचिन ठाकुर आदीनी घटनेचा निषेध केला आहे.





टिप्पण्या