court news: शारीरिक अत्याचार प्रकरण: सबळ पुराव्या अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता




अकोला: कापशी येथील महिलेच्या घरात शिरून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार व जिवाने मारण्याची धमकी देण्याच्या आरोपातून सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. 


कापशी गावातील निखील पुनवासी केवट याने आपल्या घरा शेजारील आपल्याच दूरच्या नात्यातील एका महिलेस तिची लहान बालिका वागविण्याच्या बहाण्याने रात्री महिलेच्या घरात शिरत तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बाथरूम मध्ये अतिप्रसंग केला. निखील केवट याने असा प्रकार अनेक वेळा केला. या संदर्भात महिलेने आपल्या पतीस हा प्रकार सांगून पातूर पो स्टे मध्ये दि 23 सप्टेंबर 2021 रोजी तक्रार दिली होती. 


पोलिसांनी आरोपी निखील केवट विरुद्ध गुन्हा नोंद क्र 524 भादवी 376, 376 (2)452,506 अन्वये गुन्हा नोंद करीत आरोपीस अटक केली.


प्रस्तुत खटला हा अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त विशेष सत्र न्यायाधीश सुनील शर्मा यांच्या न्यायालयात चालला. न्यायालयाने बचाव पक्ष व सरकारी पक्षाची बाजू तपासून आरोपी निखील पुनवासी केवट याची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी निखील केवटच्या वतीने ॲड. अली रजा खान व ॲड. अयुब नौरंगाबादी यांनी कामकाज बघितले.

टिप्पण्या