akola zp election: भाजपची साथ वंचितचा विकास… अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदी संगीता अढाऊ; उपाध्यक्षपदी सुनील फाटकर





भारतीय अलंकार 24

अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षची निवडणूक सोमवारी पार पडली. वंचीत बहुजन आघाडीच्या संगीता अढाऊ यांचा अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुनील फाटकर यांची निवड करण्यात आली.


भाजपचे छुपे समर्थन 


वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी ही रस्सीखेच होती . मात्र २७ सदस्यांचा जादुई आकडा या दोन्ही पक्षांकडे सत्ता स्थापन करण्यासाठी नव्हता. स्पष्ट बहुमत नसल्याने भाजपाची भूमिका या निवडणूकीत निर्णायक ठरली. वंचित बहुजन आघाडीला सत्ता स्थापनासाठी भाजपने नेहमीच छुप्या मार्गाने समर्थन दिले आहे,हे आज परत एकदा स्पष्ट झाले आहे.


या निवडणकीत देखील भाजपचे उमेदवार अनुपस्थित असल्याने सर्वधिक सदस्य संख्या वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांची असल्याने ते या निवडणुकीत यशस्वी ठरले. जिल्हा परिषदेची सार्वत्रीक निवडणूक २०२० मध्ये वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केली होती. त्यावेळी सुद्धा भाजपाच्या सदस्यांनी निवडणूक सभेतून केलेले बहीर्गमन वंचित आघाडीच्या पथ्यावर पडले होते. दरम्यानच्या काळात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मात्र या निवडणुकीत भाजप सदस्य अनुपस्थित असल्याने वंचितला मोठा फायदा झाला. 



पक्षीय बलाबल




५३ सदस्यीय अकोला जिल्हा परिषदेत


वंचित बहुजन आघाडीकडे २५

शिवसेना - १२

भाजप - ०५

काँग्रेस - ०४

राष्ट्रवादी काँग्रेस - ०४

प्रहार जनशक्ती - ०१

अपक्ष - ०२





टिप्पण्या