valmiki mehtar community state convention: वाल्मिकी मेहतर समाज बावनी पंचायत राज्यस्तरीय अधिवेशन अकोल्यात उत्साहात; समाज विकासासाठी घेतले महत्वपूर्ण निर्णय



ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अनिष्ट प्रथा रूढीना फाटा देत समाज उत्थानासाठी नव विचारांची पेरणी महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज बावणी पंचायतीचे राज्यस्तरीय अधिवेशन निम्मित करण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, महिला सबलीकरण, खेळाशी निगडीत रोजगार आणि समाजाच्या परंपरा, चालीरीती अशा अनेक ज्वलंत समस्यावर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिवेशनात एकमताने निर्णय घेण्यात येवून एकदिवसीय राज्यस्तरीय उत्साहात पार पडले.


सर्व सकाल पंच व समाजसेविकांच्या संमतीने  महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज बावणी पंचायतीचे राज्यस्तरीय अधिवेशन बुधवार २१ सप्टेंबर भिरड मंगल कार्यालयात पार पडले . या राज्यस्तरीय अधिवेशनाला राज्यभरातील हजारो वाल्मिकी समाज बांधव उपस्थित होते. 


अधिवेशन मध्ये समाजातील विविध समस्या सोडवून समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी उपाययोजना बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.  


संमेलनात महाराष्ट्रातील सर्व नवनियुक्त मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज बावनी पंचायतची कार्यकारिणी अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी जाहीर केली. 


महाराष्ट्रातील विविध ठिकाणी समाजाची परंपरानुसार मलमपट्टी करण्याची प्रथा बंद करण्यात यावी. ही प्रथा बंद करण्यासाठी राज्यस्तरीय तंटामुक्त समिती स्थापन करावी, वैवाहिक कार्यात वधू-वरांचा आदर मर्यादेपर्यंत आणला पाहिजे. तसेच समाधि समाधनाचा मान जोड्याने करावा, गाव पट्टीचा इटके कार्यक्रम पूर्णत: बंद करण्यात यावा आणि जन्मासाठी आत व बाहेर कार्यक्रमात होणारा कौटुंबिक रक्षकही पूर्णपणे बंद करण्यात यावा, महाराष्ट्र राज्य बावनी पंचायत सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातर्फे राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व इतर क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या समाजातील नागरिकांचा सत्कार करण्यात यावा. महाराष्ट्र राज्य बावनी पंचायतीमार्फत जिल्हास्तरीय सामूहिक विवाह संस्थेला प्राधान्य देण्यात यावे. हे प्रस्ताव अकोला सकरपंचाच्या सर्वानुमते सभेत आणण्यात येवून सर्वांनी एकमताने मंजूर केला. 


अधिवेशनात महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहत्तर समाज बावनी पंचायतचे माजी अध्यक्ष प्रताप निधाने, माजी महासचिव तथा जळगावचे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरानी मार्गदर्शन केले.


अधिवेशनात महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज बावनी पंचायत चे नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश घोगलिया, कार्याध्यक्ष किशोर पीवाल,  सचिव शांताराम निधाने, बावनी पंचायतचे नवनिर्वाचित सचिव गणेश बारसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश घोगलिया यांनी केले.



अधिवेशन व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व्हिडिओ: महाराष्ट्र राज्य वाल्मिकी मेहतर समाज बावणी पंचायतीचे राज्यस्तरीय अधिवेशन 2022



 


टिप्पण्या