Ganesh festival 2022 - Akola City : विघ्नहर्ता बाप्पांचे जल्लोषात स्वागत; घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळात श्रीमूर्तीची स्थापना

                          (सर्व छायाचित्र-विनय टोले)



ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला, दि.31: विघ्नहर्त्या गणपति बाप्पाचे बुधवारी आनंदात व जल्लोषात आगमन झाले. सार्वजनिक मंडळासह घरोघरी विधीवत पूजा अर्चना करुन श्रीमूर्तीची स्थापना करण्यात आली.






कोरोना संसर्गाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे यंदा सण, उत्सव उत्साहात साजरे केले जात आहे. अबालवृद्धांमध्ये  गणेश उत्सवाचा उत्साह दिसून आाला. दरम्यान आज सकाळपासूनच बाजारपेठेत व कुंभार वाड्यात लहान मोठ्या गणेश मंडळांनी गणेश मुर्तीसह सजावट साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. जयहिंद चौक, अकोला क्रिकेट क्लब मैदान, जैन मंदीर बाजार, जठारपेठ चौक, सिंधी कॅम्प, कौलखेड चौक, गोरक्षण रोड, डाबकी रोड, वाशिम बायपास चौक, अशोक वाटिका मार्ग, दगडी पूल, नेहरु चौक मार्गावर थाटलेल्या श्रीच्या लहान मूर्तीच्या दुकानात भाविकांनी एकच गर्दी केली होती. 




गणेश भक्तांचा उत्साह 



बाप्पांना आपल्या घरी व मंडळाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी गणेश भक्तांनी नाचत व वाजत गाजत जल्लोष साजरा केला. दहा दिवसाच्या उत्सव दरम्यान गणेश मंडळांनी सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  



 

तगडा पोलीस बंदोबस्त  


जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनात गणेश उत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याकरीता १ अपर पोलीस अधीक्षक, ७ डिवायएसपी, २३ पोलीस निरीक्षक, २८ सहायक पोलीस निरीक्षक, ७१ पोलीस उप निरीक्षक व २०५० पोलीस अमलदार, ४ एस. आर. पी. प्लॉटुन, ४ आर. सी. पी. प्लॉटुन व गृहरक्षक दलाचे ७०० जवान नियुक्त करण्यात आले.



297 गणपती मंडळांना परवानगी 



अकोला शहरात गणेशोत्‍सव मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात येतो. त्‍यासाठी लागणा-या विविध विभागाचे परवानगी देण्‍याकरिता शहरातील गणेश मंडळांना अधिक सोईचे व्‍हावे तसेच या कामात सुसुत्रता येण्‍याचे अनुषंगाने गणपती उत्‍सव – 2022 करिता मनपा आयुक्‍त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांच्‍या आदेशान्‍वये अकोला महानगरपालिकेच्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे दि. 22 पासून ते 31 ऑगस्‍ट 2022 पर्यंत शासनाच्‍या निर्देशानुसार सर्व परवानग्‍या एकाच छता खाली मिळविण्‍यासाठी एक खिडकी योजना प्रणाली कार्यान्‍वीत करण्‍यात आली होती. याव्‍दारे आज दि. 31 ऑगस्‍ट 2022 शेवटच्‍या दिवशी पर्यंत एकुण 297 गणपती मंडळांना परवानगी देण्‍यात आली आहे. 




सरी बरसल्या 


दिवसभर उन आणि कुठे रिमझिम पावसाने हजेरी लावली.मात्र रात्री ११ वाजताच्या सुमारास मेघ गर्जने सह विजांचा कडकडाटडा त जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. 





टिप्पण्या