Akola court: संघटन प्रकरणात आरोपी पटेल यास मिळाला जामीन




भारतीय अलंकार 24

अकोला: शासकीय नावाशी साधर्म असल्यामुळे संघटनेने फसवणूक केली असल्याच्या कारणावरून फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस अकोला न्यायालयाने जामीन मंजूर केला.



याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुर्तीजापुर येथील फिर्यादी राहुल येदवर याने फेसबुक वर राष्ट्रीय मानवा अधिकार संघटन या नावाने झळकत असलेल्या संघटनची माहिती घेत या संघटनेचे जबलपूर मध्यप्रदेश येथील  राष्ट्रीय अध्यक्ष महेश लालमन पटेल यांच्याशी संपर्क करीत या संघटनेचे सदस्य प्राप्त केले. तसेच यदुवर यांनी आपल्या अनेक मित्रांनाही या संघटनेचे सदस्य बनविले. पटेल यांनी येदवर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूकही केली. येदवर यांनी संघटनेचे सदस्य होताना त्यांचे व इतरांचे असे मिळून 5000 रुपये संघटनेस बहाल केले. मात्र नंतर नेमणुकीचे पत्र कशाच्या आधारे देण्यात आले, यासाठी कोणती पद्धत अवलंबविण्यात आली याबाबत फिर्यादी यांना काहीही माहिती देण्यात आली नाही.सबब येदवर यांनी मूर्तिजापूर पोस्टे मध्ये आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.मुर्तीजापुर पोलीसांनी अ.र.न.  309/ 22 प्रमाणे भादवी कलम 419,420, सहकलम 3,4,5  प्रतीक व नाव वापर अयोग्य प्रतिबंध अधिनियम 1950 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.या संदर्भात आरोपी महेश लालमन पटेल रा.जबलपूर मध्यप्रदेश यांनी स्थानीय जिल्हा व सत्र न्यायालयात नोटरी, ॲड.मो. ईलियास शेखानी यांच्या मार्फत जामीनांसाठी फौजदारी अर्ज क्र 688/22,दि 2/9/22 अनव्ये अर्ज सादर केला.अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.बी. पतंगे यांनी आरोपी महेश लालमन पटेल यांना वैयक्तिक बॉण्ड व 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.

टिप्पण्या