- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: शहरामध्ये श्रावण महिन्यात शिवभक्त श्री राजराजेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. या कालावधीत वाहतुक सुरळीत राहण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजराजेश्वर मंदिर परिसरातील वाहतुक, अकोट राज्य महामार्गावरील वाहतूक व अकोला-दर्यापूर मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने रविवार दि. 21 ऑगस्टचे दुपारी 12 वाजेपासून ते सोमवार दि. 22 चे रात्री आठ वाजेपर्यंत तर अकोला शहराकरीता दि. 22 चे रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने बदलाचे आदेश जिल्हाधिकारी प्रभारी अनिल खंडागळे यांनी निर्गमित केले आहेत.
अकोला-अकोट मार्गावरील वाहतुक मार्गात केलेले बदल
सध्या सुरु असलेला मार्ग- अकोला बस स्थानक – रेल्वे स्टेशन चौक – आपातापा चौक – गांधीग्राम मार्गे अकोट कडे जाणारी वाहतूक व अकोट ते अकोला कडे याच मार्गाने येणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- अकोला बस स्थानक – भगतसिंग चौक – वाशिम बायपास – शेगाव टी पॉईंट – गायगाव – निंबा फाटा – देवरी फाटा – अकोट तसेच अकोट ते अकोला येणारी वाहतूक याच मार्गाने वळविण्यात येईल
अकोला-दर्यापूर मार्गावरील वाहतुक मार्गात केलेले बदल
सध्या सुरु असलेला मार्ग- अकोला बस स्थानक – रेल्वे स्टेशन चौक – आपातापा चौक – म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूर ते अकोला कडे याच मार्गाने येणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- अकोला बस स्थानक – टॉवर चौक – रेल्वे स्टेशन टिळक पार्क मार्गे – सातव चौक – न्यु तापडीया नगर – खरप टी पॉईंट – म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूर ते अकोला कडे येणारी वाहतूक याच मार्गाने वळविण्यात येईल
अकोला शहरातील वाहतुक मार्गात केलेले बदल
सध्या सुरु असलेला मार्ग- डाबकी रोड-जुने शहर-श्रीवास्तव चौक-विठ्ठल मंदिर-अलका बॅटरी चौक-जयहिंद चौक-कोतवाली चौक-गांधी चौक-अकोला बस स्थानक तसेच डाबकी रोड जुने शहर ते भिमनगर चौक दगडीपूल मार्गे मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- डाबकी रोड जुने शहर-भांडपुरा चौक-पोळा चौक-किल्ला चौक-हरीहरपेठ-वाशिम बायपास चौक-राष्ट्रीय महामार्ग6 ने लक्झरी स्टॅण्ड-जेल चौक-अशोक वाटिका चौक ते अकोला बस स्थानक
सध्या सुरु असलेला मार्ग- अकोला बस स्थानक-गांधी चौक-कोतवाली चौक-जयहिंद चौक-डाबकी रोड तसेच पोळा चौक, हरीहरपेठ कडे जाणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- अकोला बस स्थानक-अशोक वाटिका चौक-नेहरु पार्क चौक-हुतात्मा चौक-संत कवरराम उड्डाण पूल-लक्झरी स्टॅण्ड-वाशिम बायपास चौक-हरीहरपेठ-किल्ला चौक-भांडपुरा चौक-जुने शहर डाबकी रोड
सध्या सुरु असलेला मार्ग- रेल्वे ओव्हर ब्रिज-अकोट स्टॅण्ड टिळक रोड मार्गे बियाणी चौक-कोतवाली चौक-लक्झरी बस स्टॅण्ड-वाशिम बायपास कडे जाणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- रेल्वे ओव्हर ब्रिज-रेल्वे स्टेशन चौक-अग्रसेन चौक-ओव्हर ब्रीज वरुन जेल चौक-लक्झरी बस स्टॅण्ड- वाशिम बायपास कडे
सध्या सुरु असलेला मार्ग- लक्झरी बस स्थानक-कोतवाली चौक-टिळक रोड मार्गे अकोट स्टॅण्ड कडून रेल्वे स्टेशन कडे जाणारी वाहतूक
पर्यायी मार्ग- लक्झरी बस स्थानक चौक-जेल चौक-ओव्हर ब्रीज वरुन-अग्रसेन चौक-रेल्वे स्टेशन चौक.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा