Morna river -rain update -Akola city: मोर्णा नदी पाणी पातळीत वाढ ;अकोला शहरातील राजराजेश्वर सेतू पाण्याखाली



भारतीय अलंकार 24

अकोला: जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे आज सकाळी दगडपारवा लघु प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाली आहे. या धरणात ३१६.१० मि.ली. म्हणजेच ६१.०४ % पाणीसाठा झाला आहे. दगडपारवा धरणाचे दरवाजे उघडल्याने अकोला शहरातून वाहणारी मोर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.



दगडपारवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दगडपारवा धरणाचे दरवाजे उघडल्याने अकोला शहरातून वाहणारी मोर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे जुन्या शहराला नवीन शहराशी जोडणारा श्री राजराजेश्वर सेतू पाण्याखाली गेला आहे.जिल्हा प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूने कठडे लावून नागरिकांना पूल ओलांडण्यास मनाई केली आहे. मात्र, काही नागरिक या निर्देशाला झुगारून आपला जीव धोक्यात टाकून नदीच् पुराच्या पाण्यातून चालण्याचा आनंद घेत आहेत. 




Latest update

वान प्रकल्प 

आज दि. १८/०७/२०२२ रोजी सायंकाळी ५:४५   वाजता वान  प्रकल्पाचे  एकूण ४ वक्रद्वारे प्रत्येकी ५० सेमी उंचीने उघडण्यात येणार असून नदीपात्रात एकूण  ६४.८५ घ.मी./से  एवढा विसर्ग सोडण्यात येणार आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे. तसेच सर्व संबंधित यंत्रणा यांना नदीच्या दोन्ही तिरावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्याबाबत व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देण्यात यावे ही विनंती.



Wan Project

18/07/2022           

4:30 pm

Level - 404.60 mtr

Storage - 51.73 Mm3

Percentage  -  63.13 %



 वान  प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


टिप्पण्या