- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला,दि.7: रस्ता अपघाताचा चढताआलेख बघता, जिल्ह्यातील विविध मार्गांवरील अपघातप्रवण स्थळे निश्चित करुन त्यावर मार्गदर्शक सूचनांचे व जागृती करणारे फलक लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले आहेत. यावर अमलबजावणी झाल्यास निश्चितच अपघातांची शक्यता कमी होईल.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी बाळापूर डॉ. रामेश्वर पुरी, उपविभागीय अधिकारी अकोट श्रीकांत देशपांडे, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, महापालिकेचे अजय शर्मा, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षय पांडे उपस्थित होते.
अतिक्रमण व होर्डिंग्ज हटविणार
शहरातील विविध चौकात सिग्नल लावण्यात आले आहेत, तथापि, अतिक्रमणे व होर्डिंग्ज यामुळे सिग्नल दृष्टीपथात येणे व थांबण्यासाठी पुरेशी जागा नसणे ही समस्या येत आहे. यासमस्येवर उपाय म्हणून प्रत्येक सिग्नल चौक हे मोकळे करावे, असे निर्देश देण्यात आले.
ऑटो रिक्षांवर स्टिकर्स लावण्याची मोहिम
ऑटो रिक्षांवर शहरी व ग्रामिण भागासाठी हिरवे व लाल रंगाचे स्टिकर्स लावण्याची मोहिम लवकरात लवकर पूर्ण करुन शहरात येणाऱ्या ऑटोरिक्षांच्या प्रमाणावर नियंत्रण आणावे. जिल्ह्यातील रस्त्यांवर वेगमर्यादा पालन होण्यासाठी आवश्यकतेनुसार रस्त्यांवर खुणा कराव्या. वेगमर्यादा फलक लावावे. अशी ठिकाणे निश्चित करुन आवश्यक कारवाई पूर्ण करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी अरोरा यांनी दिले.
यासंदर्भात 8 जुलै रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत अहवाल सादर करावा,असेही त्यांनी स्पष्ट केले. रस्ते सुरक्षा प्रतिज्ञेचे विमोचनह जिल्हाधिकारी अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.
खडकी - मलकापूर परिसरात स्वच्छतेचा अभाव: मनपाचे दुर्लक्ष
अकोला: खडकी - मलकापूर परिसर अकोला महानगरपालिकेमध्ये येऊन पाच वर्ष पूर्ण होत आहे. तरी या परिसरातील भागाला विकासापासून मनपा प्रशासनाने दूर ठेवलेला आहे .आज पाच वर्षे होत असताना सुद्धा खडकी मलकापूर परिसरात नाल्या पावसाळ्याच्या तोंडावर पूर्ण तुडुंब भरलेले आहे. कोणत्याही प्रकारची या परिसरात नाल्यांची स्वच्छता होत नाही. रस्त्यांवर कचऱ्याचे चौकाचौकात ढीग लागले आहे .परंतु मनपा प्रशासन फक्त कर वसुली करण्यात व कर वाढवण्यात मसुरुला आहे. हद्दवाढ परिसर हा पहिलेच गरीब, शेतकरी, मजुरांचा परिसर आहे. त्यांना मनपाला हवे असलेले कर भरणे अशक्य असतानासुद्धा मनपाने स्वतःच्या फायद्यासाठी व या परिसराची लूट करण्यासाठी या गोरगरीब जनतेवर अन्याय करून हा परिसर मनापा हद्दीत घेतला. परंतु आज पर्यंतही महानगरपालिका परिसरात ज्या सुख सुविधा दिल्या जातात त्यातील अर्धी सुखसुविधा या परिसरात दिल्या जात नाही. यापेक्षा येथील जनतेचे म्हणणे आहे की, ग्रामपंचायतीच्या सुविधा खूप चांगला होत्या. परिसरातील नाल्या, मोठे नाले व वेगळा वेगळ्या चौकात कचऱ्याचे गंज पडलेले आहे. फक्त कागदोपत्री घोडे नाचून स्वच्छता रेकॉर्ड वर दाखवल्या जात आहे. प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारची स्वच्छता या परिसरामध्ये केल्या जात नाही. स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता कर्मचारी हे फक्त पगार घेण्यापुरतेच शिल्लक आहेत. लोकांनी अनेक तक्रारी केल्या वर सुद्धा महिना महिला परिसराची स्वच्छता केल्या जात नाही. अनेक नाल्यांचे पाणी हे खुल्या प्लॉटमध्ये जात असल्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात मच्छरांचा पादुर्भाव झालेला आहे . परंतु मनपा प्रशासन व कर्मचारी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करते. मनपा प्रशासन फक्त कर वसूली करण्याकरता जनतेच्या मागे लागलेले आहेत. या सर्व गोष्टीची अनेक वेळा मनपाकडे निर्भय बनो जन आंदोलनाच्या वतीने अनेक तक्रारी केलेले आहेत. परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. मनपाच्या वतीने पावसाळा सुरू होण्याआधी या सर्व गोष्टीची कारवाई करून या परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा अन्यथा निर्भय बनो जन आंदोलनच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संयोजक गजानन हरणे, जिल्हाध्यक्ष प्रमोद धर्माळे, यूगेश्वरी हरणे मा.पंचायत समिती सदस्य आदीसह स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा