political Maharashtra: महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती म्हणजे सोयरिक एकाशी अन् लग्न दुसऱ्याशी- ॲड.उज्वल निकम यांचे वक्तव्य


 

अकोला :  "सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसुत्र तिसऱ्याचे अन् गर्भ चौथ्याचा", सध्या महाराष्ट्र राज्याची राजकिय परिस्थिति अशी झाली आहे, असे खोचक वक्तव्य ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनी केले. 


ॲड. निकम हे रविवारी एका सन्मान सोहळा निम्मित अकोल्यात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे ॲड.निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनौपचारिक झालेल्या चर्चेत त्यांनी महाराष्ट्राच्या सध्याच्या सत्तानाट्यावर कडाडून टीका केली.


कायद्याच्या पळवाटाचा वापर राजकिय शक्ती करत असतात. यासाठी पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचे देखील एका प्रश्नाच्या उत्तरात निकम म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत विधानसभा उपसभापती काय निर्णय देतात यावर राजकीय कोंडीचे भवितव्य आहे. त्यावेळीच ही कोंडी फुटणार, असे निकम यांनी सांगितले.


न्यायालामध्ये काय निकाल लागेल हे सांगता येणं आज कठीण आहे. पण सध्याची स्थिती अशी आहे की, 'वसंतरावांच्या घरी नांदायचं, गळ्यात मंगळसूत्र पंडीतरावांच्या नावाचं घालायचं, उखाणा विलासरावांच्या नावाचा घ्यायचा आणि गर्भ मात्र देवरावांचा वाढवायचा', अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निर्माण झाली आहे.   पावसाळा जवळ असल्यामुळे शेतकऱ्यांचे  जटील प्रश्न सरकारला सोडवावे लागणार आहेत. अशा प्रकाराची गुंतागुंत ही जास्त वेळ लांबणे हे निश्चित राज्याच्या स्थिरतेला चांगले लक्षण नाही. कुठेतरी हे थांबले पाहिजे. राज्यकारभार सुरळीत चालला पाहिजे, अशी अपेक्षा ॲड निकम यांनी व्यक्त केली.


राजकारण हा खेळचं असतो. त्याच्यामुळे राजकारणात प्रत्येक नागरिकाला हे अपेक्षित असत, कारण राजकारण हे सत्तेच्या टोकापर्यंत जात असल्यामुळे सत्तेचा सारीपाट कोणाच्या ताब्यात आणि तो सारीपाट आपल्याकडे कसा येईल असा प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रयत्न करत असतो. त्यालाच राजकारण असं म्हणतात. परंतू हे राजकारण सामान्य नागरिकाच्या हिताशी खेळणारं नको, असा मौलिक सल्ला देखील ॲड.निकम यांनी यावेळी  दिला. 


या बातमीचा video पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टिप्पण्या