नीलिमा शिंगणे जगड
अकोला: लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून तीच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या युवकाला अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.आरोपीचे आकाश देविदास इंगळे असे आहे.
आज ८ जून रोजी वि. अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांनी आरोपी आकाश देविदास इंगळे (वय अंदाजे २६ वर्ष, रा. मालठाणा, ना तेल्हारा, जि. अकोला) याला भादवि कलम ३६३. ३६६, ३७६, पोक्सो कायदयाचे कलम ३/४/५/६ अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
घटनेची हकीकत अशी की, पिडीतेने दि.०५.०२.२०२० रोजी पो स्टे उरळ येथे फिर्याद दिली की, आरोपी हा सन २०१९ मध्ये पिडीतेच्या नातेवाईकांना पिडीतेचे लग्नाची मागणी घालण्याकरिता त्याच्या नातेवाईकासह तिच्या घरी आला होता. परंतु पिडीतेच्या वडिलांनी ती अल्पवयीन असल्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर दि.०९.१०.२०१९ रोजी पिडीता ही तिच्या मामाच्या घरी लोणाग्रा येथे जाण्याकरिता नींबा फाटा येथे ऑटोची वाट पाहत उभी असतांना, आरोपी हा तेथे आला व तिला मारण्याची धमकी देऊन पुणे येथे घेऊन गेला. त्यानंतर तिला तुळजापूर (जि. पुणे) येथे घेवुन गेला. लग्नाचे आमिष दाखवून मारण्याची धमकी देऊन तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले. त्यानंतर २ ते ३ महिन्यांनी आरोपीने त्याचे मामाचे घरी वडनेर (जि. अमरावती) येथे घेवुन गेला. त्यानंतर तिला तीच्या गावी पाठवून दिले. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बळजबरी शरीर संबंध केला असल्याने तिच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाचा तपास करून, तपास पूर्ण झाल्यावर न्यायालयात आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
या प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरीता एकुण ०८ साक्षीदार तपासले. तसेच पिडीता अल्पवयीन असल्याने ती शिकत असलेल्या शाळेतील मुख्याध्यापक यांचा व तिला तपासलेल्या डॉक्टरांचा व इतर साक्षीदारांचा पुराचा ग्राहय मानुन न्यायालयाने आरोपी आकाश देविदास इंगळे याला ३७६ व पोक्सो कायदयाचे कलम ३/४ ५/६ अंतर्गत दोषी ठरवत १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रु. १०,०००/- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कारावाची शिक्षा तसेच भादवि कलम ३६६ अंतर्गत दोषी ठरवन ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रु. ७०००/- दंड अशी शिक्षा ठोठवली. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा.
या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील शाम खोटरे यांनी सरकार पक्षाची बाजु मांडली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून हे. कॉ. ढोकणे व एल.पी.सी. सोनु आढे यांनी सहकार्य केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा