fragrant tobacco-food and drugs: जनता भाजी बाजारात सुंगधी तंबाखु विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; आरोपी सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात



                                     संग्रहित छायाचित्र




अकोला,दि. 7: जनता भाजी बाजार येथील दुकान नं. 9 बी येथे सुंगधी तंबाखु  विक्री होत असल्याचे माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. या आधारावर अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे यांनी दुकानाची तपासणी केली असता, सुंगधी तंबाखु (वाणी प्रिमियम) व सुंगधी तंबाखु (बब्बु गोल्ड) या अन्न पदार्थाचा एकुण 18 हजार 700 रुपयाचा साठा विक्रीकरिता साठवलेला आढळला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे यांनी साठा जप्त करुन दुकान मालकास ताब्यात घेतले. 


            

आरोपी रमेश कन्हैयालाल गुरनाई यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदाचे कलमासह भा.द.वि.चे कलम 328, 188, 272, 273 नुसार गुन्हा दाखल करुन सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. ही  कारवाई सहआयुक्त अमरावती शरद कोलते व सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रभाकर काळे यांनी केली.

टिप्पण्या