- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
All trains will run after 828 days:akl: तब्बल ८२८ दिवसांनी सर्व रेल्वे धावणार कोविड - १९ पूर्वप्रमाणे...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. अमोल इंगळे
अकोला: कोविड - १९ कोरोना व्हायरसमुळे जगात हाहाकार माजला होता. भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याच वेळी, भारतात कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 4 वर पोहोचली होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या मुद्द्यावर देशाला संबोधित करत सर्व देशवासीयांना या रविवारी २२ मार्च २०२० रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे पालन करण्यास सांगितले होते.
अकोला रेलवे स्टेशन तिकीट घर बंद
याच दरम्यान रेल्वे विभागाने रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दिनांक २३ मार्च २०२० कामाख्या - मुंबई एक्सप्रेस हि शेवटची रेल्वे अकोला मार्ग गेली. या रेल्वे ने अकोला मध्ये ५३ प्रवासी उतरले. ज्यांची तपासणी अकोला स्टेशन वर करण्यात आली. यांच रेल्वे ने अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत ४ जवान अकोला उतरून वाहनाने आपल्या मूळगावी नांदेडला रवाना झाले. या नंतर अकोला स्टेशन वरील तिकीट घर बंद झाले.
दिनांक ४ मे २०२० ला अकोला मधून पहिली 'श्रमिक रेल्वे' धावली. त्यानंतर जुन महिन्यापासून ऐक ऐक करत रेल्वे सुरु झाल्यात. परंतु जनरल तिकीट मात्र बंद होते. आरक्षण असलं तरच रेल्वेतुन प्रवास करता येत होता.
२०२० ला कोरोना पहिली लाट, २०२१ ला कोरोना दुसरी लाट व जानेवारी २०२२ ला कोरोना तिसरी लाट आली. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतांना प्रवाश्यांकडून रेल्वे मध्ये जनरल कोच लावण्याची मागणी होऊ लागली.
मध्य रेल्वेने दिनांक १६ मार्च २०२२ रोजी लांबपल्ल्याच्या १६५ रेल्वे २९ जुन २०२२ पासून जनरल कोच सोबत कोविड १९ पूर्वीप्रमाणे धावतील जाहीर केले. रेल्वे व जनरल कोच याची सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली. यात अकोला मार्ग ३० रेल्वे धावणार आहेत.
उद्या तब्बल ८२८ दिवसांनी सर्व रेल्वे कोविड १९ पूर्वीप्रमाणे धावणार आहेत. आरक्षण नसले तरी थेट स्टेशनवर तिकीट काढून रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
दिवाळीनंतर एसटी कर्मचारी संप सुरु असताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. उद्यापासून करोना काळातील काही कटू आठवणी विसरून प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येणार आहे.
रेल्वे यादी: क्रमांक, रेल्वे नाव, जनरल कोच क्रमांक
12111 मुंबई अमरावती D1,D2,D3,D4,DL1,DL2
12112 अमरावती मुंबई D1,D2,D3,D4,DL1,DL2
12139 मुंबई नागपूर सेवाग्राम D1,D2,D3,D4,DL1,DL
12140 नागपूर मुंबई सेवाग्राम D1,D2,D3,D4,DL1,DL
12135 पुणे नागपूर D1,D2,DL1,DL2
12136 नागपूर पुणे D1,D2,DL1,DL2
11404 कोल्हापूर नागपूर D1,D2,D3,DL1,DL2
11403 नागपूर कोल्हापूर D1,D2,D3,DL1,DL2
12145 मुंबई पुरी (टिटिलागढ़ मार्गे) D1,D2
12879 मुंबई भुवनेश्वर D1,D2,DL1
22848 मुंबई विशाखापट्टणम D1,D2,D3,D4,D5,D6,DL1,DL
22865 मुंबई पुरी D1,D2,D3,D4,DL1,DL2
12809 मुंबई हावडा मेल D1,D2,DL1
12859 मुंबई हावडा गीतांजली D1,D2,DL1
12869 मुंबई हावडा साप्ताहिक D1,D2,DL
12129 पुणे हावडा आझाद हिंद D1,D2,D3,DL1,DL2
22893 शिर्डी हावडा D1,D2,D3,D4,D5,DL1,
22511 मुंबई - कामाख्या कर्मभूमि D1,D2,D3
12105 मुंबई गोंदिया विदर्भ D1,D2,DL1
12850 पुणे बिलासपूर D1,D2,D3,DL1
11039 कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र D1,D2,D3,DL1,DL2
22151 पुणे काझीपेठ D1,D2,D3,D
12766 अमरावती तिरुपती D1,D2,D3,D4,DL1,DL
17642 नरखेड काचिगुडा D6, D7, D8, D9, D10, D11,D12,D13,D14,DL1,DL2
12101 मुंबई शालिमार ज्ञानेश्वरी D1,D२
12151 मुंबई शालिमार समरसता D1,D2
12811 मुंबई हतीया D1,D2,DL1
22846 पुणे हतीया D1,D2,D3
20926 अमरावती सुरत D1,D2,D3,D4,D5,D6,D7,D8,D9,D10,DL1,DL2
22137 नागपूर अहमदाबाद प्रेरणा D1,D2,D3,D4,DL1,DL
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा