Akola court: बालिकेसोबत असभ्य वर्तन करणाऱ्या दोघांना सक्त मजुरीची शिक्षा




भारतीय अलंकार 24

अकोला:  बोरगांव मंजु पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आकाश गजानन राठोड व अमित गोपाळ चव्हान (दोघंही रा खडका, ता. जि. अकोला ) यांना अल्पवयीन बालिकेचा विनय भंग करून असभ्य वर्तन केल्याच्या आरोपात आज दोषी ठरविण्यात आले आहे. 



विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही डी. पिंपळकर यांचे न्यायालयात आरोपी वर सदर आरोपांबद्दल दोषारोप ठेवण्यात आले होते. पिडीतेच्या आईने दि ०४/०९/२०२० रोजी या बाबत फिर्याद दाखल केली होती. प्रकरणात सरकार तर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यांचे आधारे न्यायालयाने आरोपीना दोषी ठरवल्यानंतर भा. द.वी. ३५४ कलामामध्ये मध्ये दोषी ठरवून ५ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ३५४ अ कलामामध्ये दोषी ठरवून ३ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ३५४ ड कलामामध्ये मध्ये दोषी ठरवून ३ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, ४५२ कलामामध्ये दोषी ठरवून ७ वर्ष सक्त मजुरी १००००/- रू दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद,  ५०६ कलमामध्ये दोषी ठरवून २ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, तसेच पॉक्सो कायदाच्या कलम ७-८  मध्ये दोषी ठरवून ५ वर्ष सक्त मजुरी १००००/- रू दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद, पॉक्सो कायदाच्या कलम ११-१२  मध्ये दोषी ठरवून ३ वर्ष सक्त मजुरी ५०००/- रू दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली, सर्व शिक्षा आरोपींना एकत्रित भोगवयाच्या आहेत.  (अधिकतम शिक्षा ७ वर्षे). दंडाची एकूण रक्कम प्रतेकी रू ४५०००/- आरोपी कडून वसूल झाल्यास त्या पैकी अर्धी रक्कम पिडीतेस व अर्धी रक्कम शासनास देण्यात यावी, असे आदेशात नमूद आहे. विणा पांडे पो. उपनीरिक्षक यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल दिपक कांडारकर व सी एम एस चे प्रवीण पाटील यांनी पैरवी म्हणून सहाय्य केले.




खुनाच्या आरोपातुन निर्दोष मुक्तता



फिर्यादी रणजीत भगवान हेरोडे यांची तक्रार वरुन पोलिस स्टेशन उरळ येथे आरोपी गोविंदा आनंदा खंडारे याच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपी गोविंदा खंडारे विरुद्ध सासु  बनाबाई भगवान हेरोडे हिला घासलेट टाकून जिवंत जाळल्याचे आरोप होते. या प्रकरणात विद्यमान तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांच्या कोर्टात सरकार पक्षाने एकूण 11 साक्षीदार तपासले. परंतु बचाव पक्षाने केलेले प्रभावी युक्तिवाद वरुन न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता दिनांक 1 /6/2022 रोजी केली. या प्रकरणात आरोपी तर्फे वकील मुन्ना खान , दुष्यतसिंह चौहान व नीलोफर खान यांनी काम पाहिले.



आत्महत्या आणि मारहाण प्रकरणी अकोट फाईल पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचा आदेश


प्राप्त माहितीनुसार,अर्जदार अरुण सोपान राजगुरे यांच्या मुलावर मनीषा श्रीनाथ व उमेश श्रीनाथ (राहणार उगवा)  यांनी विनयभंगचा खोटा गुन्हा अर्जदार दाखल केला होता. अकोट फाईल पोलिसांनी अर्जदाराच्या मुलाला आरोपी बनवून त्याला कारागृहात पाठवले. अर्जदाराचे मुलाचा जामीन प्रलंबित असताना, मंगला श्रीनाथ आणि उमेश श्रीनाथ यांनी कोर्टात येऊन कोर्टाबाहेर अर्जदार आणि त्याची पत्नी यांना खूप त्रास देवून, जीवाने मारण्याची धमकी दिली. मंगला श्रीनाथ आणि उमेश श्रीनाथ यांनी संगनमताने अर्जदार आणि त्यांच्या पत्नीला घरी जाऊन मारहाण केली. जामीन होऊ द्यायची असेल तर 2 लाख रुपये द्या असे म्हटले.  मंगला श्रीनाथ आणि उमेश श्रीनाथ या नवरा बायकोच्या त्रासाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली असल्याचा आरोप अर्जदार यांनी केला.


या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी अकोट फाईल पोलीस स्टेशन येथे अर्जदार गेले असता, पोलीस कर्मचारी मंगला आणि उमेशचे ओळखीचे असल्याने अर्जदार यांची तक्रार नोंदवली नाही. ही तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली. पण त्यांनी ही अर्जदाराची तक्रार नोंदवली नाही,असा आरोप अर्जदार यांनी केला होता.  


यानंतर अर्जदार यांनी विद्यमान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी  यांचे कडे कलम 156(3) सी आर पी सी प्रमाणे वकील मार्फत अर्ज दाखल केला.  आरोपी मंगला श्रीनाथ आणि उमेश श्रीनाथ राहणार उगवा यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अकोट फाईल पोलीस स्टेशन अकोला यांना न्यायलयाने  दिले आहेत. अर्जदार तर्फे अजय लोंढे वकील यांनी काम पाहिले.


टिप्पण्या