Photo: भारतीय रेल
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आरआरबी एनटीपीसी 2022 सीबीटी-2 (RRB NTPC 2022 CBT-2) परीक्षा 9 आणि 10 मे रोजी देशभरातील परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. ही परीक्षा रेल्वे भरती बोर्ड ग्रेड पे 4 आणि 6 पदवीधर पदांसाठी आयोजित केली आहे. या परिक्षार्थीच्या सोयी सुविधेसाठी भारतीय रेल्वेने 9 आणि 10 मे रोजी देशभरात 65 हून अधिक विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापैकी बहुतेक गाड्या 8 मे रोजी धावतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी लवकर त्यांच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचता येईल. नंतर परीक्षा संपल्यानंतर त्यांना घरी परत नेण्यात मदत होईल.
नागपूर आणि सिकंदराबाद दरम्यान आरआरबी परीक्षा विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. या ट्रेनसाठीचे बुकिंग आज 6 मे रोजी सुरु झाली आहे. ही ट्रेन नागपूर येथून 7 मे रोजी दुपारी दीड वाजता सुटणार आहे, अशी माहिती रेल्वे च्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा