Nitin Gadkari Amrit Sarovar project: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अमृत सरोवर योजनेची पाहणी करुन केले जलपूजन





नीलिमा शिंगणे- जगड 

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 'अमृत सरोवर योजने'ची सुरुवात केली आहे. केन्द्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेच्या माध्यमातून अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ परिसरात राष्ट्रीय महामार्ग व जलसंधारणाची कामे या माध्यमातून अनेक तलाव पुनर्जिवीत करण्यात आले आहेत. यामुळे परिसराची सिंचन क्षमता १०० हेक्टर वरून ६०० हेक्टर इतकी झाली आहे आणि भविष्यात ती २५०० हेक्टर होण्याचा अंदाज आहे. या यशस्वी कामाची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक दळणवळण मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी करून कृषि विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या तलावाचे जलपूजन केले. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले व लोकप्रतिनिधी उपस्थीत होते.




नितीन गडकरी अकोला जिल्हा दौऱ्यावर असून, यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग व जलसंधारणाची कामांची पाहणी केली. दुपारी अकोल्यातील दोन उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते अकोला दौऱ्यावर आहेत.






भाजपाच्या वतीने स्वागत 



ना. नितीन गडकरी यांचे अकोला जिल्हयात आगमन प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वणी रंभापुर येथे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी स्वागत केले. यावेळी आमदार आकाश फुंडकर, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल यांनी राज्याचे कृषी मंत्री नामदार दादा भुसे  यांचे स्वागत केले.





याप्रसंगी आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार अमोल मिटकरी आमदार नितीन देशमुख, तेजराव थोरात, गोपाल दातकर, वसंत बाछुका, प्रकाश मिश्रा, गणेश अंधारे, गणेश सारसे, माजी आमदार गजानन दाळू गुरूजी, दिलीप आसरे, गणेश पोटे, सुरेंद्र विसपुते आदी उपस्थित होते.


टिप्पण्या