Mohit Rathi enters IIM Ahmedabad पहिल्याच प्रयत्नात मोहित राठीला आयआयएम अहमदाबाद मधे प्रवेश




भारतीय अलंकार 24

अकोला, दि.17 : जगातील अग्रगण्य संस्थांमध्ये एक असलेली आणि व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट म्हणजे आय.आय.एम.अहमदाबादची प्रवेशपूर्व परिक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तिर्ण करून मोहित रमेश राठी यांनी 'एमबीए इन फायनान्स' विषयाच्या पदवी करीता प्रवेश मिळवून घेतले आहे. 



पदवी परिक्षा असलेला' एमबीए इन फायनान्स' हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम असून गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात असलेली व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणा-या या संस्थेत प्रवेश मिळवून मोहित राठीने अकोला शहराचे नावलौकिक केले आहे. 



अहमदाबादमधील आय.आय.एम.ची स्थापना 1961 मध्ये झाली असून, कोलकात्यातील आय.आय.एम. नंतर स्थापन होणारे भारतातील दुसरे आय.आय.एम. आहे. मॅनेजमेन्टचे प्रशिक्षण देणाऱ्या जगातील अग्रगण्य संस्थांमध्ये गणना असलेल्या या संस्थेत प्रवेश प्राप्त करणारा मोहित राठी हा अकोला येथील नारायण ब्रदर्सचे संचालक रेखचंद राठी यांचा नातू व आर्किटेक्ट रमेश राठी यांचा मुलगा आहे. 



कठोर परिश्रम व चिकाटीने अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात प्रवेश  प्राप्त मोहितने क्रिडा क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. स्कैटिंगमधे राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतला होता. अभियांत्रिकी (इंजीनियरिंग) पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना नाटकमंचन आणि विविध स्पर्धा मधे सहभागी हो‌वून मोहितने अनेक पदक व पुरस्कार पटकावले आहे. 'गीता' वर आधारित काव्यपाठ स्पर्धामधे आपल्या अमोघ वक्तृत्वाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे त्यांने दहावी मधे  97 आणि बारावी मधे 93 टक्के गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवून घेतले होते. नागपुरातील विश्वेशराय नैशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थेतून कम्युटर इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान मोहितने 9 पॉइंटर प्राप्त केले, कॅट परिक्षा मधे 99.88 परसेंटाइल प्राप्त केले. नोकरी सोबतच शिक्षण सुरु ठेवले होते. आपल्या यशाचं श्रेय  दृढ़निश्चय, परिश्रम सोबतच आई ममता रमेश राठी व सर्व कुटुंबीयांना देत आहे. 

टिप्पण्या