crimes filed under POCSO & IT Act: कोचिंग क्लासेसचा संचालक वसीम चौधरीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या: पॉक्सो व आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल
नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : शिक्षण हब म्हणून अलीकडे ओळखल्या मिळविलेल्या अकोला शहरातच शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. कोचिंग क्लासेसच्या संचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी पाक्सो व आयटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करुन या संचलकाला बेड्या ठोकल्या आहेत.  विदर्भात नावाजलेले चौधरी कोचिंग क्लासेसचे संचालक वसीम चौधरी याच्यावर एका 16 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो सह भारतीय दंड विधान, आय टी ॲक्ट अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार,  वसीम चौधरीने आधी मेसेज द्वारे  मैत्री करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महत्वाचे काम आहे सांगत आपल्या घरी बोलावले. काही वेळ बोलल्यानंतर वसीम चौधरीने तिला मागील खोलीत नेले आणि गैर कृत्य करण्यास सुरुवात केली. मात्र मुलीने त्याला विरोध केला असता याची वाच्यता बाहेर कुठे केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने आपबीती आपल्या आईला सांगितली व पोलीसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी वसीम चौधरी विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून, घटनेची गंभीरता लक्षात घेत कोचिंग क्लासवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


या प्रकरणी वसीम चौधरीला अटक केली असून, मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पुढील कारवाई करत असल्याचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

 


 

सिव्हिल लाइन्स पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून भादंवि कलम 354 (अ,ब,ड) विनयभंग करणे, पोस्को कलम 9 एफ, 10 अल्पवयिन मुलीसोबत अश्लिल चाळे करणे आणि आयटी ॲक्ट कलम सहा, सात (ब) मोबाईलवर अश्लिल चॅटिंग करने आदी गुन्हे दाखल केले आहे. सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी आरोपी वसीम चौधरीला अटक केली आहे. पुढील तपास सायबर पोलिसांच्या मदतीने सिव्हिल लाईन्स पोलीस करीत आहेत.दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चौधरी कोचिंग क्लासेसला सील लावले असल्याची माहिती आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी कोचिंग क्लासचे संचालक वसीम चौधरी याने अनेक युवतींची छेड काढली आहे. मात्र बदनामीची भिती, शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून तरुणी तक्रारी देण्यास टाळले. आता मात्र वसीम चौधरी विरोधात गुन्हे दाखल झाल्याने चार ते पाच युवती व त्यांचे पालकांनी तक्रार करण्यासाठी पुढे पावले उचलली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अकोला शहरात ही पहिलीच घटना नसून,या आधी देखील एका नावाजलेल्या कोचिंग क्लासेसच्या संचालक विरूध्द त्याच्याच क्लासेसच्या विद्यार्थिनीने विनयभंग व बलात्कार केल्याचा आरोप करीत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, सामजिक राजकिय क्षेत्रातील काही व्यक्तींनी या प्रकरणात हस्तक्षेप करून मुलीला व तिच्या पालकांना समजावून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. पोलिसांवरही दबाव तंत्र वापरून प्रकरण जागच्या जागी मिटविले होते. मात्र,हे प्रकरण त्यावेळी शहरात चर्चिल्या गेले होते, रविवार 22 मे रोजी उघडकीस आलेल्या प्रकारामुळे धूसर पडलेले या प्रकरणाची आठवण अकोलेकरांमध्ये ताज्या झाल्या. असे प्रकार परत घडू नये, यासाठी विध्यार्थी व पालकांनी सावध असणे गरजेचे झाले आहे. 

टिप्पण्या