Boat-capsizes-Sindhudurg-tarkarli: सिंधुदुर्ग मध्ये समुद्रात बोट उलटून अपघात: अकोल्याचा युवक आकाश देशमुखचा दुर्दैवी मृत्यू

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सिंधुदुर्ग मधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे बोट समुद्रात उलटून अपघात झाला आहे. ही बोट पर्यटकांनी भरलेली होती. यामध्ये अकोल्यातील आकाश देशमुख नामक युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. हा युवक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांचा भाचा आहे. आकाश देशमुख कुटुंबात एकुलता एक मुलगा होता.


जय गजानन नावाच्या या बोटीत तब्बल 20 पर्यटक होते. त्यातील दोघे पर्यटक बुडल्याची माहिती मिळत असून काही पर्यटक गंभीर जखमी आहेत. या सर्वांना मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर जखमींना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ही हलविण्यात येणार आहे.
स्थानिक पोलीस अधिकारी तसेच महसूलची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.  काही गंभीर जखमींना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ही उपचार्थ पाठविले असल्याची माहिती आहे.टिप्पण्या