Akola court : मारहाण प्रकरणात तीन आरोपींना सहा महिन्याचा कारावास




भारतीय अलंकार 24

अकोला: मुली सोबत बोलण्याच्या कारणावरून एका इसमावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांना दोषी ठरवत त्यांना प्रत्येकी सहा महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.



संजय गांधी नगर येथे राहणारा सुलेमान खान नासिर खान हा छोटे खान उर्फ छोटू पैलवान याच्या मुली सोबत बोलत असताना.  छोटे खान यांनी बघितले होते, यावरून सुलेमान खान व आरोपी छोटूखान यांच्यात 26 जून 2015 रोजी शाब्दिक वाद झाला. यानंतर प्रकरण मिटले.  मात्र रात्री छोटे खान यांचा मुलगा शाहरुख खान याने फोन करून सुलेमान खान याला घराजवळ बोलावले. सुलेमान खान हा त्यांच्या घराजवळ गेला असता छोटे खान,  शेख जहीर मोहम्मद तूराक व शाहरुख खान छोटे खान यांनी सुलेमान खान याला पकडून काठ्या पाईपने मारहाण केली, असा आरोप सुलेमान खान याने आपल्या फिर्यादीत केला होता. अकोट फाइल पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध 323 324 34 नुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात हजर केले.



या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपसी समझोता झाला असे आरोपीतर्फे न्यायालयात सांगण्यात आले होते, मात्र दाखल गुन्हा तडजोडीस पात्र नाही या कारणावरून आरोपीचे म्हणणे न्यायालयाने विचारात घेतले नाही. 



सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मीनाक्षी बेलसरे यांनी महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर आणले. यामध्ये सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पटेल,तपास अधिकारी रमेश खंडारे, पैरवी अधिकारी राजेश ठाकूर, हेकॉ बाळकृष्ण वानखडे यांच्यासह अन्य महत्त्वाच्या साक्षी नोंदविल्या गेल्या. 



आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी  ग दी. पाटील यांनी तीन आरोपींना प्रत्येकी सहा महिने कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड तसेच दंड भरल्यास पुन्हा तीन महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली.

टिप्पण्या