Welcome-Indian-New-Year-Akola: भारतीय नववर्षाचे अकोल्यात जल्लोषात स्वागत: संस्कृति संवर्धन समितीने काढली मोटरसायकल महारॅली




ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला : कोरोनाचे निर्बंध उठवल्यावर संपूर्ण राज्यात आज गुढी पाडवा व भारतीय नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. अकोल्यात देखील यानिमित्त संस्कृति संवर्धन समितीने मोटरसायकल महारॅली काढली. या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.



सकाळी आठ वाजताच्या सुमारास अकोलाचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिर येथून रॅलीला सुरूवात झाली. पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषा आणि मंगल वस्त्र परिधान करून सर्व वयोगटातील महिला व पुरुष स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. 






शहरातील मुख्य मार्गावरून रॅली निघाली.बुलेट चालवणाऱ्या महिला या स्वागत यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. रॅलीचा समारोप बिर्ला राम मंदिर येथे करण्यात आला.



प्रारंभ श्री राज राजेश्वर मंदिर, जयहिंद चौक मार्गे काळा मारोती मंदिर, मोठा पूल, सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर, जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, पंचायत समितीचे समोरून, राणी सती मंदिर, जुना राधाकीसन प्लॉट मधील गुरुद्वारा महेश्वरी भवन, मेन हॉस्पिटल मार्ग, अशोक वाटिका, बस स्टैंड चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेकलेस रोडवरून सिव्हिल लाइन्स चौक, जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राऊत बाडी मार्गे, जठारपेठ चौक, सातव चौक, बिर्ला लेआऊट मधील जलाराम बाप्पा मंदिर. यात्रेचा समारोप महाआरतीने बिर्ला राम मंदिर येथे झाला. दरम्यान ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत सामाजिक संस्था व नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत केले. सातव चौकात ढोल ताशा पथकाने सहभाग घेत यात्रेत उत्साह आणला. ठिकठिकाणी भव्य, सुंदर आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या.




राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल रॅलीत सहभागी झाले होते. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारोच्या संख्येने या यात्रेत अकोलेकरांनी सहभागी होवून  नववर्षाचं स्वागत केले.



संस्कृती संवर्धन समिती गेल्या 16 वर्षांपासून गुडीपाडवा निम्मित नववर्ष स्वागत उत्सव व यात्रेचे आयोजन करीत आहे. मात्र, कोरोना कालखंडात निर्बंधमुळे आयोजन छोटेखानी झाले होते. अकोल्यात कोरोना निर्बंध उठविण्यात आल्याने यावर्षी मोठ्या उत्साहात नववर्ष स्वागत मोटरसायकल महारॅली काढून करण्यात आले. 



संस्कृती संवर्धन समिती, अकोला 



अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, कार्याध्यक्ष प्रा. नितीन बाठे, कार्याध्यक्ष मनीष अग्रवाल, संयोजक: महेश जोशी, सहसंयोजक शरद वाघ, स्वानंद कोंडोलीकर, मीनाक्षी अपोतीकर, सोनल ठक्कर, रश्मी कायंदे, प्रचार प्रसार प्रमुख समीर थोडगे, निलेश देव, स्वप्नील बोरकर, श्रीराम रथ: प्रशांत पाटील, मंदिर भेटी व धर्म ध्वज प्रदान: सुनील पसारी, राम मोरगावकर, गजानन घोंगे, रांगोळी सजावट: बबलू जोशी, फेटे: पवन केडीवा, यात्रा मार्ग स्वच्छता :  निलेश देव.




टिप्पण्या