Thailand Open International Boxing Championship 2022:Ananta-India: थायलंड खुली आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा 2022: शाब्बास चॅम्प! महाराष्ट्राच्या अनंता चोपडेला सुवर्ण पदक

बॉक्सर अनंता चोपडे याने थायलंड ओपन मधे भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.अंतिम लढती मधील एक क्षण (photo courtesy BFI)





ॲड. नीलिमा शिंगणे- जगड

अकोला: अनंत प्रल्हाद (54 किलो) ने आक्रमकता आणि बचावात्मक असे मिश्रण करीत उत्कृष्ट बॉक्सिंगचे खेळ प्रदर्शन करीत  रिथियामन साईला पराभूत करून थायलंड ओपन  मध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली. अनंताने 5-0 असा विजय मिळविला.


 


   

अनंता चोपडे याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत उपांत्य फेरीत बुई थ्रोंग (थाई) ला मागे टाकण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली,आणि फुकेत येथे सुरु असलेल्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत काल प्रवेश निश्चित केला होता. काल दुपारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत अनंताने सुंदर खेळप्रदर्शन करीत 5 - 0 अश्या गुणांनी विजय मिळवित थेट अंतिमफेरी गाठली होती. भारताला अनंता कडून सुवर्ण पदकाची आशा होती. अनंताने तमाम भारतीय बॉक्सिंग प्रेमीना निराश न करता आज सकाळी सुवर्ण पदकावर ताबा मिळविला.




अकोला क्रीडा प्रबोधिनीचा प्रशिक्षणार्थी 

थायलंड ओपन:अनंता चोपडेची सुवर्ण पदकासाठी झुंज (photo courtesy BFI)



अनंता प्रल्हाद चोपडे हा अकोला (विदर्भ) क्रीडा प्रबोधिनीचा प्रशिक्षणार्थी आहे. अनंताने टोकियो ऑलिम्पीक टेस्ट इफेक्टमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने गौरवांकित अनंताला भारतीय रेल्वे खात्यात स्पोर्ट कोट्यात नोकरी मिळाली आहे. अनंता चोपडे मूळ बुलडाणा जिल्हाचा आहे. अकोला येथील वसंत देसाई क्रीडांगण येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचन्द्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात अनंताने बालपणा पासून बॉक्सिंग प्रशिक्षण प्राप्त केले आहे.  उत्कृष्ट खेळप्रदर्शनच्या आधारावर अनंताने यापूर्वी देखील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजविल्या आहेत. 




पश्चिम विदर्भात जल्लोष 

थायलंड ओपन: अनंता चोपडे याला विजयी घोषित करताना पंच (photo courtesy BFI)


आज सकाळी  साडे अकरा वाजताच्या सुमारास अनंताच्या विजयाचे वृत्त कळताच पश्चिम विदर्भातील बॉक्सिंग प्रेमींनी जल्लोष केला. अनंताने अंतिम फेरीत सुवर्ण पदक निश्चित करताच क्रीडा विभाग महाराष्ट्र, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, अकोला बॉक्सिंग परिवार व  क्रीडा प्रेमी नागरिकांनी  अनंतावर शुभेच्छाचा वर्षाव केला.

टिप्पण्या