उपांत्य फेरीत लढत देत असताना अनंता चोपडे (photo courtesy:BFI)
ॲड. नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: अनंता चोपडे याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत उपांत्य फेरीत बुई थ्रोंग (थाई) ला मागे टाकण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केली,आणि फुकेत येथे सुरु असलेल्या थायलंड ओपन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आज दुपारी झालेल्या उपांत्य फेरीच्या या लढतीत अनंताने 54 किलो वजन गटात सुंदर खेळप्रदर्शन करीत 5 - 0 अश्या गुणांनी विजय मिळवित थेट अंतिमफेरी गाठली. भारताला अनंता कडून सुवर्ण पदकाची आशा आहे. अंतिम फेरीत त्याचा मुकाबला थायलंडच्या बॉक्सर सोबत होईल.
अकोला क्रीडा प्रबोधिनीचा प्रशिक्षणार्थी
उपांत्य लढत अनंताने 0-5 अशी जिंकली (photo courtesy-BFI)
अनंता प्रल्हाद चोपडे हा अकोला (विदर्भ) क्रीडा प्रबोधिनीचा प्रशिक्षणार्थी आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने अनंताला शिवछत्रपति क्रीडा पुरस्कारने सन्मानित केले आहे. अकोला येथील वसंत देसाई क्रीडांगण येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचन्द्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात अनंताने बॉक्सिंग प्रशिक्षण प्राप्त केले आहे. उत्कृष्ट खेळप्रदर्शनच्या आधारावर अनंताची भारतीय संघात निवड झाली.
क्रीडाप्रेमींनी दिल्या शुभेच्छा
अनंता भारतीय संघ प्रशिक्षक, व्यवस्थापक आदिंसोबत (photo courtesy BFI)अनंताला अंतिम फेरीत विजयासाठी क्रीडा विभाग महाराष्ट्र, महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना, अकोला बॉक्सिंग परिवार व क्रीडा प्रेमी नागरिकांनी शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा