Shriram navmi 2022: चाळीस वर्षांची परंपरा: राजेश्वर नगरीत रामभक्तीचे विराट दर्शन; दोन वर्षानंतर शहरात राम नामाचा गजर





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला, दि 10 : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे 40 वर्षांची परंपरा लाभलेली श्रीरामनवमी शोभायात्रा दोन वर्ष होवू शकली नव्हती. मात्र,आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने पुन्हा त्याच नव्या उत्साहात अकोलेकरांनी श्रीराम नवमीच्या पर्वावर सायंकाळी भव्य शोभायात्रा काढून विराट राम भक्तीचे दर्शन घडविले. तर दुपारी राज राजेश्वर नगरीतील सर्व राम मंदिरात धार्मिक रीतिरिवाजाने श्रीराम जन्म उत्सव साजरा करण्यात आला.





शहरातील सर्व भागातील नागरिक उत्सवात सहभागी झाले होते. रामभक्तांच्या सहभागासह विविध संस्थाद्वारा शोभायात्रेत 35 जिवंत देखावे, 20 दिंडींच्या सहभागाने उत्साह आणला होता. यामुळे यावर्षीची श्रीराम नवमी शोभायात्रा भव्य-दिव्य व आकर्षक ठरली.



ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिरापासून सायंकाळी भव्य शोभायात्रेला आरंभ झाला. जयहिंद चौक, सिटी कोतवाली चौक,टिळक मार्ग मोठे राम मंदिर, जुना कपडा बाजार, किराणा बाजार, जैन मंदिर ,गांधी चौक दुर्गा मंदिर समोरून शोभा यात्रा गांधी रोड असा मार्गक्रमण करीत गणेश घाट येथे पोहचून यात्रेचे समापन करण्यात आले. रात्री 10: 30 पावणे अकरा वाजता शेवटचा देखावा गांधी चौक पार झाला होता. यानंतर शोभा यात्रा थांबविण्यात आली.





दरम्यान,शोभा यात्रेचे स्वागत फुलांचा वर्षाव करून, फटाक्यांची आतिषबाजी करुन ठिकठिकाणी करण्यात आले. सामाजिक संस्थांनी मार्गात रामभक्त यांसाठी शीतल जल, शरबत प्रसादचे वाटप केले. शोभायात्रेत देखावा द्वारे धार्मिक सह सामाजिक जनजागृती करण्यात आली. राम दरबार, रामभक्त हनुमान देखावा, लव कुश आदी देखव्यानी लक्ष वेधले होते. तर सिटी कोतवाली चौकातील भव्य हनुमान देखावा उत्सवाचे आकर्षण ठरले.




अवघी नगरी सजली 




रामनवमी पर्वावर अवघी राजराजेश्वर नगरी सजली. गांधी चौक, राजेश्वर मंदिर, मोठा पूल, टिळक रोड, मोठे राममंदिर, डाबकी रोड ,हरीहर पेठ, शिवनगर,शिवाजी नगर आदी परिसर भगव्या झेंडया पताकांनी सजला होता. 





वाहतूक बदल मुळे नागरिकांचे हाल; व्यापारी त्रस्त


रामनवमी उत्सवाच्या निम्मित रविवारी रोजी वाहतुकीच्या मार्गात सकाळ पासूनच बदल करण्यात आला होता. श्री राजेश्वर मंदिर येथून श्रीरामनवमी शोभायात्रा सुरुवात होऊन जयहिंद चौक, कोतवाली चौक, बियाणी चौक, सराफ चौक, गांधी चौक, कोतवाली चौक मार्गे शोभा यात्रा काढण्यात आली. यासाठी  मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तसेच शोभा यात्रा मार्गालगतच्या शंभर फूट परिसरात वाहने उभी करण्यास बंदी केल्या गेली होती. या मार्गाला जोडणाऱ्या प्रत्येक गल्ली बोळा आणि रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तसेच हे मार्ग दिवसभर बंद ठेवण्यात आले होते, रविवार इतर दिवसाच्या तुलनेत खरेदी साठी अधिक येतात. परंतू दिवस भर मार्ग बंद असल्याने ग्राहक दुकानांकडे वळले नाहीत. पहिलेच दोन वर्ष कोरोनाचे दुकाने बंद होती. आता प्रत्येक सण उत्सव निमित्त दुकाने बंद ठेवायची का,अशी खोचक प्रतिक्रिया गांधीरोड वरील दुकानदारांनी दिली.


तगडा पोलीस बंदोबस्त 


दिवसभर अकोला विभाग पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. 



शिवसेना मोटासायकल यात्रा


सार्वजनिक रामजन्मोत्सव समितीतर्फे सकाळी भ्व्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली राज राजेश्वर मंदिर येथून शिवसेना शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात निघाली.



राम जन्म उत्सव


परंपरा आणि धार्मिक विधी नुसार शहरातील 

मोठे राममंदिर, छोटे राम मंदिर, गांधी चौक राम उत्सव समिती, बिर्ला राम मंदिर आदी ठिकाणी राम  जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गांधी चौकात सायंकाळी महाआरती करण्यात आली.




टिप्पण्या