shiv sena gopi kishan bajoria akola: माजी आमदार गोपिकिसन बाजोरिया यांच्या घरावर ईडी धाडीचा बनाव; मागितले गाड्या आणि घराचे कागदपत्र

     file pic-gopikisan bajoria




अकोला: राज्यात सध्या सर्वत्र ईडी धाडीच्या चर्चा रंगतात.अनेक राजकीय नेते, उद्योजक, सिने सृष्टी मधील व्यक्ती एवढेच नव्हेतर शासकिय बडे अधिकारी यांच्यावर इडीने कारवाई केल्याचे सर्वश्रुत आहे. अशातच अकोला येथे माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांच्या घरावर इडीची धाड पडली, मात्र ही धाड ईडीच्या खऱ्या अधिकाऱ्यांनी नव्हेतर तोतया इडी अधिकाऱ्याने टाकली असल्याची बाब समोर आली आहे. सध्या हा तोतया अधिकारी पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.




शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या बंगल्यात एक व्यक्ती कार घेवून आली. आपण आयबीकडून आलो असल्याचे त्या व्यक्तीने बाजोरिया कुटुंबीयांना सांगितले. एवढ्यावरच तो थांबला नाहीतर या व्यक्तीने सर्व  वाहनांची व घराच्या कागदपत्रांची माहिती घेण्यास सुरुवात केली. यामुळे आमदार कुटुंबीयांचा संशय बळावला. यानंतर हा व्यक्ती बनावट अधिकारी असल्याचे लक्षातच येताच या प्रकरणी खदान पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 



अशी घडली घटना


माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या बंगल्यात एक कार अचानक थेट पार्कींग स्थानी आत गेली. या कारचा क्रमांक एमएच 04 एफयू 0919. याच कारमधून एक व्यक्ती उतरला. आणि थेट माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया यांचे बंगल्या समोरील बाकावर जावून बसला. या व्यक्तीला पाहून यश अश्विनकुमार बाजोरिया यांना संशय आला.




यानंतर यश आणि त्यांचे काका संजय बाजोरीया व सुनील बाजोरीया यांनी त्यांच्या जवळ जावून चौकशी केली असता, त्याने आपण आयबी अधिकारी असल्याचे सांगून सर्व गाड्यांची कागदपत्र आणि चाव्या मागितल्या. यानंतर बाजोरिया कुटुंबीयांचां संशय अधिकच बळावला. यावेळी बजोरिया कुटुंबीय सोबत त्या व्यक्तिने वाद घालून दोन गाड्यांची चावी घेतली. त्यानंतर त्या व्यक्तिने घराचे कागदपत्र मागितल्याने बाजोरिया कुटुंबीयांनी त्याला ओळखपत्र मागितले. परंतू, त्या व्यक्तीने ओळखपत्र दाखविण्यास नकार दिला. नंतर या व्यक्तिने बाजोरिया यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. बाजोरिया कुटुंबीयांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. मात्र त्याने शिवीगाळ करून धमकी दिली. यानंतर बाजोरिया कुटुंबीयांनी त्याला बंगल्याबाहेर काढले.


या सर्व घडामोडीत त्या व्यक्तीचे नाव प्रतिक संजयकुमार गावंडे असल्याचे कळले. यानंतर बाजोरिया कुटुंबीयांनी खदान पोलिस स्टेशन या व्यक्ती विरूध्द तक्रार दाखल केली. यश बाजोरिया यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी आरोपी प्रतीक संजयकुमार गावंडे विरुद्ध भा दं वि कलम 452, 506 नुसार गुन्हा दाखल केला.  



आरोपी प्रतिक गावंडे याला वाहनांची आवड आहे. विविध फॅन्सी व युनिक नंबरचे छायाचित्र काढण्याचा देखील छंद असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हा व्यक्ती वेगवेगळ्या वाहनांचे छायाचित्र काढण्यासाठी बाजोरिया यांच्या बंगल्यात गेला असावा, असा कयास आहे.


टिप्पण्या