road accident-akola-student-tractor: मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने चिमुकल्या सायकल स्वार विद्यार्थ्याला दिली धडक; विद्यार्थी गंभीर जखमी, ट्रॅक्टर चालक पोलिसांच्या ताब्यात

 कौलखेड भागात हा अपघात घडला. घटनास्थळ




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला : कौलखेड भागातील विद्यार्थी शाळेत  जात असतानाच त्याच्यावर आज घात झाला. त्याच्या सायकलला मागील बाजूने एका ट्रॅक्टर चालकाने जोरदार धडक दिली. यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. रोहित प्रवीण आगाशे असे या चिमुकल्याचे नाव आहे.




रामकृष्ण नगर श्रध्दा न ३ येथे राहणारा रोहित हा आज शाळेत कौलखेड भागातील दुर्गा लॉन्स जवळून सहकार नगर मधील खंडेलवाल शाळेच्या दिशेने जात असताना, पाठीमागून येणाऱ्या मधधुंद ट्रॅक्टर चालकाने त्याच्या सायकलला धडक दिली. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले, आणि त्याने रोहित सह एका दुचाकीस्वाराला धडक दिली. सुदैवाने दुचाकीस्वारने चालत्या गाडीवरून उडी मारल्याने तो किरकोळ जखमी झाला तर दुर्दैवाने रोहितच्या अंगावरून ट्रॅक्टर गेला. ट्रॅक्टर क्रमांक MH 30 AB7380 असा आहे.



खासगी दवाखान्यात उपचार सुरू


जखमी विद्यार्थी


गंभीर जखमी असलेल्या रोहितला तात्काळ अकोल्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू, त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 




रस्ता रोको आंदोलन

नागरिकांनी घटने नंतर केले रस्ता रोको आंदोलन

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी काही वेळ रस्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या आवाहनानंतर रस्ता वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला अटक केली आहे.





टिप्पण्या