Public awareness rally on helmet use: हेल्मेट वापराबाबत जनजागृती रॅली; उपप्रादेशीक परिवहन कार्यालयाचा उपक्रम






भारतीय अलंकार 24

अकोला दि.12 : उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस रवाना करण्यात आले. 





अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांची यावेळी उपस्थिती होते.



जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोर्णा या मुख्य प्रवेशद्वारापासून सकाळी साडेआठ वाजता ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत उपप्रादेशीक परिवहन कार्यालय  तसेच अन्य शासकीय कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते. 





जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेल्या या रॅलीतील प्रत्येक दुचाकीस्वार महिला पुरुषाने हेल्मेट परिधान केलेले असल्याने या रॅलीने शहरावासियांचे लक्ष वेधून घेतले. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी कार्यालय येथे या रॅलीचा समारोप झाला.



टिप्पण्या