open matches-kabaddi-Akola sport: कबड्डीचे खुले सामने: खंडेलवाल महाविद्यालय अकोला संघ अजिंक्य; चंपामाता संघ माळेगाव बाजार उपविजेता, जाणता राजा तोंडगाव संघाला तृतीय स्थान







*कबड्डी हा मैदानी खेळ युवकांचे आरोग्य आणि सामाजिक सलोखा सांभाळतो -आमदार बळवंत वानखडे 



*महापुरुषांच्या जयंती निम्मित तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचा समारोप 





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: जुने शहर डाबकी रोड परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अकोला  शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीन दिवसीय खुले कबड्डीचे सामने आयोजित केले होते. जिल्हाभरातील कबड्डी संघांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवार 17 एप्रिल रोजी उशिरा रात्री खेळला गेला. खंडेलवाल महाविद्यालय व चंपामाता संघ माळेगाव बाजार संघात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात खंडेलवाल महाविद्यालय संघाने विजय मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. जाणता राजा तोंडगाव संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले



 

दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते नाणेफेक करून अंतिम सामना प्रारंभ केला गेला. या सामन्यात खंडेलवाल महाविद्यालय संघ विजेता ठरला असून, या विजेत्या कबड्डी संघाला अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रकाश तायडे यांनी रोख 31 हजार रुपये प्रथम बक्षीस दिले तर या सामन्यात उपविजेता ठरलेल्या कबड्डी संघाला अकोला महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे यांनी द्वितीय क्रमांकाचे रोख 21 हजार रुपयेचे बक्षीस चंपामाता कबड्डी संघ माळेगाव बाजार यांना दिले आहे तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या  जाणता राजा तोंडगाव कबड्डी संघाला भीमनगर मित्र मंडळाने रोख रक्कम 11 हजार रुपयेचे बक्षीस दिले आहे  



या कबड्डी स्पर्धेत प्रामुख्याने शिवशक्ती कबड्डी संघ उमरी,यंग क्लब कबड्डी संघ अकोला, राजेश्वर संघ अकोला ,7 स्टार संघ बोडखा , जाणता राजा संघ तोंडगाव ,श्री प्रभू रामचंद्र संघ भांबेरी ,चंपा माता संघ माळेगाव बाजार ,प्रशिक्षण केंद्र कबड्डी संघ अकोला, हनुमान मंडळ केळीवेळी आदी संघांनी उत्तम खेळ प्रदर्शन केले.





राज्यातील  ग्रामीण भागातील लोकांचा महत्वाचा मैदानी खेळ म्हणून कबड्डीला ओळखले जाते या  खेळाचे प्रमुख आकर्षण  युवकांना  मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे  ग्रामीण भागातील युवकांच्या आरोग्याचे रक्षण  कबड्डी हा खेळ करतो. तर या मैदानी खेळ कबड्डीमुळे सामाजिक सलोखा सांभाळला जातो, असे मत दर्यापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी व्यक्त केले. वानखेडे यांच्या  हस्ते नाणेफेक करून कबड्डी स्पर्धेचा  अंतिम सामना  खेळण्यासाठी   प्रारंभ करतांना त्यांनी मत व्यक्त केले 






कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित त्र्यंबकदादा शिरसाठ, मोहम्मद इरफान, तपस्सू मानकीकर, सोमेश दिघे, मोहम्मद युसुफ, रवींद्र तायडे, मनीष हिवराळे, अभिलाष तायडे, सुनील शिरसाट, महेंद्र गवई, दिनेश खोबरागडे, जिल्हा कबड्डी असोसिएशन संघाचे वासुदेवराव नेरकर, उमाकांत कवडे, रामभाऊ अहिर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन स्पर्धा आयोजन समिती प्रमुख तथा काँग्रेस पक्षचे युवा नेतृत्व आकाश शिरसाट यांनी केले.

टिप्पण्या