Liquor-sale-closed-VBA-demand: वंचितच्या मागणी नुसार भिमजयंतीला जिल्ह्यात मद्यविक्री बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

                                           File image



भारतीय अलंकार 24

अकोला, दि. 12 : वंचित बहूजन युवा आघाडीच्या पुढाकाराने भिमजयंती संदर्भात नियोजन भवनात आयोजित सभेमध्ये पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र पातोडे, गजानन गवई ह्यांनी परवानगी, मिरवणूक बाबत जिल्हा प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या. त्यातच गुरुवार दि. १४ एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्यांनी दि. १४ एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.



जिल्हाधिकारी ह्यांनी काढलेल्या आदेशाचे वंचित बहूजन युवा आघाडीने स्वागत केले आहे.तसेच जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.



जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशःगुरुवारी (दि.14) जिल्ह्यात मद्यविक्री बंद


अकोला दि.12:  गुरुवार दि.14 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.


महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये गुरुवारी (दि.14) कायदा सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या