kirtan melava- Akola - cultural event: अकोल्यात "नाचू कीर्तनाचे रंगी"हा सात दिवसीय कीर्तन मेळावा





ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : सार्वजनिक वारकरी कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने कोरोना काळानंतर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यसाठी  सात दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे.  20  ते 26 एप्रिल पर्यंत जवाहर नगर परिसरातील राजे संभाजी पार्क येथे सायंकाळ 7.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत हा कीर्तन उत्सव होत असून, यात राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती रविवारी समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.


20 एप्रिल रोजी सायंकली 7.30 वाजता या कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प बेलोरा येथील युवा कीर्तनकार हभप महेश महाराज मारवाडी हे गुंफणार आहेत. 




गुरुवार दिनांक 21 एप्रिल रोजी जळगावच्या गाडेगाव येथील विनोदाचार्य हभप शिवाजी महाराज बावस्कर, दिनांक 22 एप्रिल रोजी बाल कीर्तनकार म्हणून ख्यातनाम असणारे हभप सोहम महाराज काकडे हे मेहकर येथील बाल कीर्तनकार किर्तन करणार आहेत.शनिवार दिनांक 23 एप्रिल रोजी नांदुरा येथील हभप ज्ञानेश्वर महाराज महाले, रविवार दिनांक 24 एप्रिल रोजी जळगाव खान्देश येथील हभप ज्ञानेश्वर महाराज जवळेकर तर सोमवार दि 25 एप्रिल रोजी पारस येथील हभप विनोदाचार्य अरुण महाराज लांडे यांचे कीर्तन होणार असून या महोत्सवाची पूर्णाहुती मंगळवार दिनांक

26 एप्रिल रोजी हभप तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या सुश्राव्य संगीतमय कीर्तनाने होणार आहे.




या सात दिवशीय उपक्रमात कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने किर्तनस्थळी दैनिक काकडा आरती, विष्णुसहस्त्रनाम, भागवत गीतेचे अध्याय, रामरक्षा स्त्रोत्र, शिवतांडव, शिवमहिमा, हरिपाठ आदि उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 



या सात दिवशीय कीर्तन महोत्सवात गायक म्हणून हभप गोवर्धन महाराज भाकरे, हभप विठ्ठल महाराज आळंदीकर हभप गणेश महाराज पाटेखेडे, हभप ज्ञानेश्वर महाराज यादगिरे हभप सागर महाराज वानखडे, हभप पुरुषोत्तम महाराज ढवळे, हभप शरद महाराज

राखुंडे टाळकरी विश्वनाथ महाराज मंडळचे समस्त सेवाधारी आपली सेवा बहाल करणार आहेत. 



परिसरात अनेक वर्षानंतर प्रथमच होत असणाऱ्या या संगीतमय कीर्तन महोत्सवाचा महिला पुरुष नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 





उत्सवाच्या सफलतेसाठी समितीचे सागर कावरे, शरद ढगे, प्रवीण काळे, कृष्णा अंधारे,अविनाश देशमुख, राजू थोरात, दत्तात्रय लांडे, गजानन पांडे, शांतनु वसु, नंदू ढाकरे, पंकज देशमुख, सौ. पूजा काळे, धीरज देशमुख, कपिल खरप, रोहन पाटील, अमोल ठोकळ, जया देशमुख, सविता चव्हाण, भूषण चतरकर, सुजय ढोरे, स्वप्नील गावडे, सोनू आवारे, विनोद नालट, स्वानंदी पांडे समवेत बहुसंख्य सेवाधारी अथक प्रयत्न घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



टिप्पण्या