Kabaddi-tournament-dabki road: डाबकीरोड जुनेशहर कबड्डी चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी: डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात घुमताहे कबड्डीचा दम…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात शुक्रवारी कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. सलामीच्या लढती मधील एक क्षण (सर्व छायाचित्र ॲड नीलिमा शिंगणे जगड) 




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला:  जुने शहर डाबकीरोडवासी कबड्डी चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरलेल्या अकोला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा दम शुक्रवार सायंकाळ पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात घुमत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या स्पर्धेचे आयोजन अकोला शहर काँग्रेस कमिटी व अकोला कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.



दोनवर्ष कोरोनामुळे कबड्डी थराराला चाहते मुकले होते. त्यात बऱ्याच काळापासून जुने शहरात भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा झाली नाही.  त्यामुळे या स्पर्धेला विशेषमहत्त्वप्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या उद्घाघाटनप्रसंगी स्वयंस्फूर्तीने जुनेशहरातील आजी माजी कबड्डी खेळाडूच नव्हेतर इतर खेळाचे खेळाडूंनी मैदानात हजेरी लावली,हे येथे उल्लेखनीय आहे. कबड्डी चाहत्यांना 17 एप्रिलपर्यंत या मैदानावर अकोल्यातील आपला आवडता संघ आणि खेळाडूंचा मैदानावरील खेळ पाहता येणार आहे.



महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव  प्रकाश  तायडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला महानगर काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे पाटील होते. या स्पर्धेचे आयोजन अकोला शहर काँग्रेस कमिटीचे सचिव तथा अकोला शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर अध्यक्ष आकाश शिरसाट  यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.


स्पर्धा उद्घाटन प्रसंगी अकोला कबड्डी असोसिएशनचे सचिव वासुदेवराव नेरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विवेक पारसकर, तप्पस्सू मानकीकर, साहेबराव शिरसाट, चंद्रमणी शिरसाट,गणेश कळसकर, वस्ताद त्र्यंबकदादा शिरसाट, महेन्द्र गवई, भीमराव जामने, चांदुदादा शिरसाट पहिलवान,सुनील शिरसाट, अभिलाष तायडे, गौतम गवई, हरिष कटारिया,राहुल शिरसाट,रवी पाटील, नफिस भाई जिलानी, राष्ट्रिय कबड्डी पंच रामभाऊ अहिर, पंच सय्यद रशीद, विलास कोथळकर, उमाकांत कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.



  प्रदर्शन सामने 


मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करुन महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत आयोजन समितीने केले. मैदानाचे रितसर पूजन करून प्रत्यक्ष सामन्यांना सुरूवात करण्यात आली. पहिल्या दिवशी दोन प्रदर्शनी सामने खेळण्यात आले. यावेळी स्पर्धेला सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेसाठी उत्तम मैदान करणारे अजबराव ताले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभाप्रदर्शन विनय बोदडे यांनी केले.



युवकांनी मैदानी खेळाकडे वळावे- प्रकाश तायडे


कोरोना कालखंड नंतर जनजीवन सुरळीत होत असताना अनेक समस्यांना देखील सर्वांना सामोरे जावे लागत आहे. युवकांनी धीर न सोडता, आत्मविश्वास न खाचविता स्वतःला सिद्ध करावे. आपल्या सर्वांच्या जीवनात आलेला हा मरगळ केवळ मैदानी खेळच दूर करू शकते. युवकांनी शारीरिक आणि आत्मिक बळ वाढविण्यासाठी तसेच ताण तणावापासून दूर राहण्यासाठी परत मैदानाकडे वळावे,असे आवाहन उद्घाटनपर भाषणात प्रकाश तायडे यांनी केले. 




आयोजक आकाश शिरसाट यांचे आवाहन 


या स्पर्धेत 17 एप्रिल पर्यंत दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुल्या गटातील पुरुषांचे कबड्डी सामने होतील. स्पर्धेत प्रथम विजेता संघाला बक्षीस रोख रक्कम 31,000/ ,द्वितीय बक्षीस 21,000/ व तृतीय बक्षीस 11,000 या तिन्ही बक्षिसं सोबत विजयी ट्रॉफी व गिफ्ट देण्यात येईल. स्पर्धेत यंग क्लब, स्टार क्लब, शिवशक्ती प्रतिष्ठान उमरी, जिल्हाप् प्रशिक्षण केंद्र, शिवशक्ती प्रतिष्ठान खडकी आदी नामवंत कबड्डी संघ सहभागी झाले आहेत. या खुल्या कबड्डी सामन्यांचा आनंद घेण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कबड्डीप्रेमींनी मैदानात यावे, असे आवाहन स्पर्धा आयोजन समिती प्रमुख अकोला शहर काँग्रेस कमिटीचे सचिव तथा अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश शिरसाट यांनी केले आहे. 


व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात घुमला कबड्डीचा स्वर,रोमहर्षक सामन्यांनी स्पर्धेला प्रारंभ



टिप्पण्या