नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अमलबजावणी झाल्यावरही पत्रकारांवर हल्ले आणि अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. बरेच अधिकारी (अपवाद वगळता) आपल्या भ्रष्टाचार आणि ठाणे परिसरात सर्रास सुरू असलेल्या अवैध धंद्याचे संरक्षण करण्यासाठी आणि पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी पत्रकारांना खोटे गुन्ह्यात अडकवण्याची धमक्या देतात. असाच काहीसा प्रकार अकोला येथे 11 एप्रिल रोजी घडला. याबाबतची लेखी तक्रार अकोट फाईल पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीची एक प्रत थेट गृहराज्यमंत्री यांच्याकडे पाठविण्यात आली आहे.
या घटनेचा थोडक्यात हकीकत अशी की, इंग्रजी वृत्तपत्राचे वरिष्ठ वार्ताहर तथा संपादक अवेज सिद्दीकी यांनी अकोट फाइल परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदे संदर्भातील बातम्या आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित केल्या होत्या. ज्याचा मनात आकस धरून अकोला येथील अकोट फाईल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी, 11 एप्रिल रोजी रात्री वृत्तांकन करून घरी परतत असलेले पत्रकार अवेज सिद्दीकी यांना अकोट फाईल उड्डाण पुलावर अडवून शिविगाळ करत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, असा आरोप अवेज सिद्दीकी यांनी अकोट फाईल पोलीस ठाण्यात 12 एप्रिल रोजी दिलेल्या लेखी तक्रारीत केला आहे.
पत्रकार संरक्षण समिती तर्फे निवेदन
या प्रकरणात ठाणेदार महेंद्र कदम यांच्यावर तात्काळ पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल व्हावे, याकरिता 13 एप्रिल रोजी पत्रकार संरक्षण समिती तर्फे अकोट तहसीलदार यांच्या मार्फत गृहराज्यमंत्री यांना निवेदन देवून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देते वेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ठाणेदार यांची चौकशी होणार
जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी याप्रकरणी चौकशी करावी, असे आदेश एसडीपीओ (शहर) यांना दिले आहेत. चौकशी मध्ये जर ठाणेदार कदम हे दोषी आढळल्यास निश्चितच कारवाई केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सिद्दीकी यांना दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा