hindu-new-year-welcome-yatra-gudi- padwa: हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची अकोल्यात जय्यत तयारी: संवर्धन समिती द्वारा 2 एप्रिल रोजी भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन

पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष डॉ. आर बी हेडा, कार्याध्यक्ष प्रा. नितीन बाठे, मनीष अग्रवाल, संयोजक महेश जोशी आदींनी स्वागत यात्रेची माहिती दिली. (Photo:nilima)





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके 1944 हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राजराजेश्वर नगरी सज्ज झाली आहे. दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची उत्तम परंपरा अकोल्यात आहे. यंदा अकोल्यात गुढीपाडव्याच्या दिवशी परपरेप्रमाणे निघणारी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या यात्रेला खंड पडला होता आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्यामुळे अकोला शहरात प्रथमच हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीने चैत्र शुद्ध प्रतिपदा, दि.2 एप्रिल रोजी भव्य दिव्य नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे.



गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा 

New Year welcome procession on the day of Gudi Padwa


संस्कृती संवर्धन समिती अकोला शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत असते. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची प्रथा संस्कृती संवर्धन समितीने 2007 मध्ये सुरु केली. स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येपासून स्वागत यात्रेच्या मार्गावर चौकचौकात भव्य रांगोळ्या काढल्या जाणार असून यात्रा मार्गवर भगवा पताका, भगवे ध्वज लावण्यात येणार आहेत तसेच अकोल्यातील अनेक मंदिरांना धर्म ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. स्वागत यात्रेचा समारोप बिर्ला राम मंदिर येथे महाआरती तथा रामरक्षा स्तोत्राने होणार आहे.




स्वागत यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे 

Everyone should participate in the welcome procession


वृंदावन गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष डॉ. आर बी हेडा, कार्याध्यक्ष प्रा. नितीन बाठे, मनीष अग्रवाल, संयोजक महेश जोशी यांनी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. या प्रसंगी संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, शरद वाघ, स्वानंद कोंडोलीकर, मीनाक्षी अपोतीकर, सोनल ठक्कर, रश्मी कायदे, समीर थोडगे, निलेश देव, स्वप्नील बोरकर, प्रशांत पाटील, सुनील पसारी, राम मोरगावकर, गजानन घोंगे, बबलू जोशी, पवन केडीया,निलेश देव ,ॲड मोतीसिंह मोहता आदी उपस्थित होते.



                 विशेष आकर्षण 


यात्रेचा प्रारंभ श्री राज राजेश्वर मंदिरातून होत विविध धार्मिक, सामाजिक, सेवाभावी संस्था ज्ञाती संस्थाचा मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. यात्रेत भगवान श्रीराम रथ, मंगलवेश, पारंपारिक वेश परिधान कलल स्त्री पुरुष, बुलटधारी महिला, बिर्ला राम मंदिर येथे सेल्फी पॉइंट, सातव चौकात संकल्प ढोल पथकाचे वादन तथा समर्थ पब्लिक स्कूलचे लेझीम पथक या यात्रेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे.



असा राहील यात्रा मार्ग 


प्रारंभ श्री राज राजेश्वर मंदिर, जयहिंद चौक मार्गे काळा मारोती मंदिर, मोठा पूल, सिटी कोतवाली, मोठे राम मंदिर, जुना कपडा बाजार, जैन मंदिर, गांधी चौक, पंचायत समितीचे समोरून, राणी सती मंदिर, जुना राधाकीसन प्लॉट मधील गुरुद्वारा महेश्वरी भवन, मेन हॉस्पिटल मार्ग, अशोक वाटिका, बस स्टैंड चौक, टॉवर चौक, रतनलाल प्लॉट चौक, नेकलेस रोडवरून सिव्हिल लाइन्स चौक, जवाहर नगर चौक, बारा ज्योतिर्लिंग मंदिर, राऊत बाडी मार्गे, जठारपेठ चौक, सातव चौक, बिर्ला लेआऊट मधील जलाराम बाप्पा मंदिर. यात्रेचा समारोप महाआरतीने बिर्ला राम मंदिर येथे होणार आहे.


                       आवाहन 

१) नव वर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व सन्माननीय धर्म प्रेमी व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. 



२) कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. 


३) यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा. 


४) शिस्तबद्ध पद्धतीने यात्रा काढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. 


५) श्री राज राजेश्वर मंदिर येथे सकाळी ६.१५ पासून फेटे बांधणे सुरू होणार आहे. त्यामुळे वेळेपूर्वी मंदिरात यावे. 


६) यात्रेत कुठेही गैरवर्तन करू नये, अकोल्यातील स्वागत यात्रा ही संपूर्ण राज्यात आदर्श आहे.


 

संस्कृती संवर्धन समिती, अकोला 


अध्यक्ष डॉ. आर. बी. हेडा, कार्याध्यक्ष प्रा. नितीन बाठे, कार्याध्यक्ष मनीष अग्रवाल, संयोजक: महेश जोशी, सहसंयोजक शरद वाघ, स्वानंद कोंडोलीकर, मीनाक्षी अपोतीकर, सोनल ठक्कर, रश्मी कायंदे, प्रचार प्रसार प्रमुख समीर थोडगे, निलेश देव, स्वप्नील बोरकर, श्रीराम रथ: प्रशांत पाटील, मंदिर भेटी व धर्म ध्वज प्रदान: सुनील पसारी, राम मोरगावकर, गजानन घोंगे, रांगोळी सजावट: बबलू जोशी, फेटे: पवन केडीवा, यात्रा मार्ग स्वच्छता :  निलेश देव.

टिप्पण्या