- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ॲड. नीलिमा शिंगणे- जगड
अकोला: विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांच्या तापमानात सध्या अचानक 2 ते 3 डिग्रीने वाढ झालेली आहे. आज अकोला, ब्रम्हापुरी आणि वर्धाचे तापमान 45 डीग्रीच्यावर गेले आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील. तर पुढचे पाच दिवस अति उष्णतेची लाट राहील, अशी शक्यता वर्तविली आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात वाढ झाली आहे, पुढील काही दिवस कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
डॉ. होसाळीकर यांनी वर्तविली शक्यता
दरम्यान, पुढील पाच दिवस विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. या काळात 30 एप्रिल ते 2 मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र,दक्षिण कोकणच्या काही भागात मेघगर्जनेची शक्यता डॉ. कृष्णानंद होसाळीकर (अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामान विभाग) यांनी आज वर्तविली आहे.
विदर्भातील आजचे तापमान: अकोला सर्वाधिक
अकोला - 45.4
अमरावती - 44.4
बुलढाणा - 42.3
ब्रह्मपुरी - 45.2
चंद्रपूर - 43.8
गडचिरोली - 42.8
गोंदिया- 43.5
नागपूर - 44.3
वर्धा - 45.1
वाशिम - 43
यवतमाळ- 44.7
अकोला जिल्हाधिकारी यांनी दिले निर्देश
भारतीय मौसम विभाग मुंबई यांच्या संदेशानुसार शुक्रवार 29 ते सोमवार 2 मे या कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे. शारिरीक श्रमाची कामे टाळावीत. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत, अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व तसेच आरोग्य यंत्रणांनी दक्ष रहावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा