Gunratna Sadavarte-Crimes-Akot: गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ: अकोटातही गुन्हे दाखल;एस टी कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

                                                 file pic




नीलिमा शिंगणे जगड

अकोला: गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. महाराष्ट्र एस टी कामगार सेना संघटनेचे कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी अकोट पोलिसात दिलेल्या तक्रारी मुळे सदावर्ते, त्यांची पत्नी आणि दोन जणांविरुद्ध अकोट पोलिसांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 



एस.टी. महामंडळात मागील पाच महिन्या पासून बेकायदेशीर संप सुरु आहे. या संप दरम्यान कर्मचारी पदाधिकारी हे वेगवेगळ्या लोकांमार्फत आर्थिक शोषण करुन संपकरी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. कर्मचारी संपामुळे व वेतन न मिळाल्याने आर्थिक विवंचनेत असून त्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक करण्यात आली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. 



अजयकुमार गुजर हे एस टी महामंडळाच्या औरंगाबाद डेपो क्रमांक 01 मध्ये प्रमुख कारागीर या पदावर कार्यरत असून ते कनिष्ट वेतन श्रेणी  एस टी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आरोपात या संघटनेद्वारे एसटी महामंडळात बेकायदेशीर पध्दतीने संपाची नोटीस देवून,  संपाला सुरवात झाली आणि संप काळात बऱ्याच कर्मचाऱ्यांची राज्य शासनात विलनीकरणाची इच्छा असल्याने मोठ्या प्रमाणात कर्मचारी या संपात सहभागी झाले. त्यामुळे एस टी प्रशासनाने सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करण्यास सुरवात केली होती. यातच संपकरी कर्मचाऱ्यांना निलंबीत व बदली करण्याचे आदेश राज्य परिवहन प्रशासनाने काढले होते. त्यातून सुटका व्हावी व आपल्यावरील कार्यवाही रद्द व्हावी या करीता कर्मचाऱ्यां मार्फत प्रयत्न सुरु झाले होते. कर्मचाऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेऊन अजयकुमार बहादरसिंग गुजर आणि गुणरत्न सदायर्ते यांनी न्यायालयात प्रकरण दाखल करुन प्रशासनाद्वारे होत असलेली कार्यवाही रद्द करुन देतो, अशा खोट्या भुलथापा देऊन कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी 300/- तथा 500/- रुपये जमा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यभरातील जवळपास 70,000 एस टी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेली रक्कम 3 करोड रुपये असल्याचा अंदाज असून, याचे पुरावे तक्रारदार विजय मालोकार यांनी पोलिसांना दिले आहेत. तर काही रक्कम अजयकुमार गुजर यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याचे पुरावे सुद्धा मालोकार यांनी पोलिसांना दिले असल्याचे कळते. अकोट पोलिसात याबाबत तक्रार दिली असल्याने ॲड. सदावर्ते यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

टिप्पण्या