ॲड नीलिमा शिंगणे- जगड
अकोला : दिवसेंदिवस वाढती महागाई , इंधन दरवाढ यांच्या विरुद्ध महानगर काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी नवीन बसस्थानक समोर महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील वानखडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत प्रचंड वाढलेल्या दरवाढीचा निषेध केला .
हिंदू नववर्षाच्या पर्वाला केंद्र सरकारने अवाजवी भाववाढ करून देशातील जनतेला महागाईची भेट दिली असून त्याचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवीन बसस्थानक चौकात आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्याया विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.
देशात महागाईने मागील काळातील उच्चांक गाठला असून सर्वसामान्य नागरिक या वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल , डिझेलचे भाव वाढतच चालले आहे. परिणामी दळण वळणाचा खर्च वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे सुद्धा भाव वाढले आहे. या सर्व महागाई मुळे सर्वसामान्य नागरिकांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिली.
2014 मध्ये जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदी सत्तेवर आले.मात्र मागील सात वर्षात महागाईचा आलेख बघितला तर नागरिक हे या अच्छे दिनाला त्रस्त झाले असून, आता नागरिक काँग्रेसच्या बाजूने उभी राहणार, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश तायडे यांनी दिली.
जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण , मदन भरगड, विवेक पारसकर, विठ्ठल मोहिते , युसूफ खान , पराग कांबळे , फजलु पहेलवान , विभा राऊत , युवक काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष आकाश कवडे, राहुल सारवान, अंकुश तायडे , मेहबूब खान उर्फ मब्बा पहेलवान , कपिल रावदेव , हरीश कटारिया यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
इंधन दरवाढ, महागाई विरोधात अकोला महानगर काँग्रेसचे आंदोलन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा