coaches-derailed-Pawan Express: मुंबईहून निघालेली पवन एक्स्प्रेस गाडीचे 11 डबे घसरले: वाहतूक प्रभावित 9 गाड्या रद्द, 5 गाड्यांचे मार्गात बदल



मुंबई - अमरावती एक्स्प्रेस, अमरावती- मुंबई, मुंबई- गोंदिया विदर्भ एक्सप्रेस रद्द


लहवित स्थानकाजवळ ट्रेन क्रमांक 11061 रुळावरून घसरल्याने काही गाड्या रद्द/छोट्या टर्मिनेटेड करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.




भारतीय अलंकार 24

नाशिक/अकोला: मुंबईहून निघालेली पवन एक्स्प्रेस रविवार 3 एप्रिल रोजी  दुपारी सव्वातीन वाजताच्या दरम्यान देवळाली लहवीत जवळ घसरली. या गाडीचे 11 डबे घसरले आहेत. अपघातामुळे मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून लांब पल्ल्याच्या आठ ते दहा गाड्या विविध स्थानकांवर थांबविल्या आहेत. वाहतूक पूर्ववत होण्यास रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात रेल्वे मार्गाचे प्रचंड नुकसान झाले.



मुंबई-जयनगर (बिहार) पवन एक्स्प्रेस इगतपुरीकडून नाशिककडे येत असताना  अपघात झाला. लहवीतजवळ रेल्वेमार्ग उखडून एक- एक डबे घसरत गेले. चाके जमिनीत फसली. यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे, जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या पथक घटनास्थळी पोहचले.


यानंतर जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गाडीतील अन्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन आणि मनपा शहर बस घटनास्थळी बोलवण्यात आल्या.


इगतपुरी आणि भुसावळ स्थानकाहून रेल्वेचे आपत्कालीन सहाय्यता पथक महाकाली क्रेनसह अपघातस्थळी दाखल. अपघातग्रस्त रेल्वे रुळावर घेणे आणि रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी किमान आठ ते दहा तास लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आली. अपघाताने मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावरील वाहतूक पूर्णत ठप्प झाली आहे.



मुंबईहून निघालेल्या आठ ते दहा गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या असून, नाशिकहून मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू असल्याने अडकलेल्या रेल्वे गाड्या काही तासांनी टप्प्याटप्प्याने रवाना होत आहे. मात्र मुंबई-नाशिक मार्गिकेने जाणाऱ्या, परंतू मुंबईहून न सुटलेल्या गाड्या रद्द केल्या गेल्या, असे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले.





मध्य रेल्वे भुसावळ विभाग


लहवित स्थानकाजवळ ट्रेन क्रमांक 11061 रुळावरून घसरल्याने काही गाड्या रद्द/छोट्या टर्मिनेटेड करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.


भुसावळ विभागातून धावणाऱ्या विशेष गाड्या खालीलप्रमाणे आहेत


रद्द केलेली ट्रेन

1) ट्रेन क्रमांक 12145 लोकमान्य टिळक टर्मिनस - पुरी एक्स्प्रेस JCO 03.04.2022 रोजीचे प्रस्थान स्थानक रद्द केले आहे.


२) ट्रेन क्रमांक – १२१४६ पुरी – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस जेसीओ – ०५.०४.२०२२ रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे.


3) ट्रेन क्र.-12111 मुंबई - अमरावती एक्स्प्रेस JCO- 03.04.2022 रोजी निघणारी स्टेशन रद्द करण्यात आली आहे.


4) गाडी क्रमांक - 12112 अमरावती - मुंबई एक्स्प्रेस JCO - 03.04.2022 रोजी निर्गमन स्टेशनवरून रद्द करण्यात आली आहे.


5) ट्रेन क्रमांक - 12105 मुंबई - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस JCO - 03.04.2022 रोजी प्रस्थान स्थानकातून रद्द करण्यात आली आहे 


6) ट्रेन क्रमांक - 17057 मुंबई सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस JCO - 03.04.2022 रोजी प्रस्थान स्थानकातून रद्द करण्यात आली आहे.


7) ट्रेन क्रमांक - 17612 मुंबई - नांदेड एक्सप्रेस JCO - 03.04.2022 रोजी निर्गमन स्टेशनवरून रद्द करण्यात आली आहे.


8) ट्रेन क्रमांक - 17611 नांदेड - मुंबई एक्सप्रेस JCO - 04.04.2022 रोजी प्रस्थान स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे.


4) ट्रेन क्रमांक - 17617 - नांदेड - मुंबई एक्सप्रेस JCO - 04.04.2022 मुंबई - मनमाड बीच रद्द राहील आणि लहान मूळ पूर्व मनमाड ते नांदेड



गाड्या वळवल्या

१) गाडी क्रमांक – १२१४३ लोकमान्य टिळक टर्मिनस – सुलतानपूर एक्सप्रेस जेसीओ ०३.०४.२०२२ वसई रोड – सुरत – जळगाव (पुढे योग्य मार्गाने)


२) गाडी क्रमांक – १२८०९ मुंबई – हावडा एक्सप्रेस जेसीओ ०३.०४.२०२२ ही कल्याण – लोणावळा – पुणे – दौंड – मनमाड येथून वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने)


३) ट्रेन क्रमांक - १२१३७ मुंबई - फिरोजपूर पंजाब मेल एक्सप्रेस JCO ०३.०४.२०२२ वसई रोड, नागदा, मुक्तसर, भोपाळ मार्गे वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने)


4) गाडी क्रमांक – १२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस दौंड – मनमाड येथून वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने)


5) गाडी क्रमांक – १३२०२ मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस – पाटणा एक्सप्रेस दौंड – मनमाड येथून वळवण्यात आली आहे (पुढे योग्य मार्गाने)



शॉर्ट टर्मिनेट ट्रेन


1) ट्रेन क्रमांक - 11402 आदिलाबाद - मुंबई एक्सप्रेस JCO - 04.04.2022 नगरसोल येथे शॉर्ट टर्मिनेटेड आणि खाली दिशेने विशेष ट्रेन म्हणून परतली


2) ट्रेन क्रमांक - 17058 सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्स्प्रेस JCO - 03.04.2022 रोजी प्रस्थान स्टेशन नगरसोल येथे शॉर्ट टर्मिनेट झाली आणि नांदेडला परतली


3) ट्रेन क्रमांक - 12106 मुंबई - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस JCO - 03.04.2022 भुसावळ येथे शॉर्ट टर्मिनेट झाली आणि 12105 मार्गावर विशेष ट्रेन EX BSL म्हणून कामावर परत आली.


4) गाडी क्रमांक – १७६१८ नांदेड – मुंबई एक्सप्रेस जेसीओ – ०३.०४.२०२२ मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेटेड 

Latest update

रात्री 12 नंतर मुंबई इथून सुटणाऱ्या रेलवे लोणावळा पुणे मनमाड मार्ग वळवण्याचे माहिती मिळाली आहे.


Ltt Hatia 00:30  first train towards Akola







टिप्पण्या