Babasaheb Ambedkar Jayanti 2022: अकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य अभिवादन मोटारसायकल रॅली

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अकोल्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी हिरवी झेंडी दाखविली.


या रॅलीत शेकडोच्या संख्येने भीम बांधवांनी सहभाग घेतला होता. तर महिलांची या मोटारसायकल रॅलीत विशेष उपस्थिती होती. अकोल्यातील नेहरू पार्क चौकातून या रॅलीला सुरवात करण्यात आली. या नंतर ही रॅली नेकलेस रोड , टॉवर चौक , बस स्टँड चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत अशोक वाटीका येथे पोहचली. या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला.


क्षणचित्रे 



एकीकृत मध्यवर्ती भिमोत्सव समिती 2022 च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त भव्य अभिवादन मोटरबाईक रॅली काढण्यात आली.



ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी झेंडी दाखवून केली सुरुवात.


 रॅलीचे अग्रभागी असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्ध यांचे पुतळ्याना पुष्प अर्पण करून झेंडी दाखवून केली सुरुवात.


शहीद स्मारक, नेहरू पार्क येथून शहिदाना अभिवादन करीत रॅली निघाली. 



हुतात्मा चौक ते सिव्हिल लाईन्स, दुर्गा चौक, अग्रसेन चौक, रेल्वे स्टेशन चौक ते शिवाजी कॉलेज, मानेक टॉकीज ते सिटी कोतवाली जवळून मनपा समोरुन बस स्थानक ते अशोक वाटिका येथे समारोप करण्यात आला.



अभिवादन रॅली मध्ये मोठ्या संख्येने तरुण आणि महिला सहभागी झाल्या होत्या.


रॅलीचे मार्गामध्ये बारा बलुतेदार संघटना आणि ओबीसी संघटनाचे पुढाकाराने सिव्हिल लाईन चौक येथे स्वागत करुन थंड पाणी,ताकचे वाटप करण्यात आले.



एल आर टि कॉलेज  दुर्गा चौक , जनता बँक चौकात नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत करत थंड पेयाचे वाटप केले. 


कोर्टा समोर अकोला वकील संघाच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले.



रक्तदान  शिबीर: अशोक वाटीका येथे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबारात युवक, युवती आणि महिलांसह बहुजन आंबेडकरी समुहाने प्रचंड संख्येने सहभाग नोंदविला.


  

टिप्पण्या