Akola City Sri Ram Navami 2022: महाराणा प्रताप चौकात उभारणार 18 फूट उंच भव्य हनुमान देखावा;रामनवमी शोभायात्रा समितीचा उपक्रम,देखावा स्थळाचे भूमिपूजन संपन्न

अकोला:भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवर




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: रामनवमी शोभायात्रा समिती द्वारा महाराणा प्रताप बाग चौकात 18 फूट उंच हनुमान  देखावा उभारण्यात येणार आहे. या देखावा स्थळाचे भूमिपूजन रामनवमी शोभायात्रा समितीचे  अध्यक्ष गजानन दाळू गुरुजी यांच्या हस्ते मंगळवार सायंकाळीं झाले. 



यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, अशोक गुप्ता, गोपाल खंडेलवाल, राहूल राठी, गणेश काळकर, सुनील पसारी उपस्थित होते.


40 वर्षांची परंपरा


अकोला शहरात गत 40 वर्षांपासून रामनवमी शोभायात्रा समितीद्वारा शोभायात्रेचे आयोजन केले जाते. शोभायात्रेत विविध देखाव्यांसह भजनी मंडळ, दिंडी आणि नागरिकांचा मोठा सहभाग असतो. कोरोना प्रादुर्भावानंतर 2 वर्षे शोभायात्रा उत्साहात साजरी करता आली नाही. यावर्षी रामभक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. रामनवमी शोभायात्रा समितीने उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.


18 फूट उंच हनुमंत देखावा 


महाराणा प्रताप बाग चौकात 18 फूट उंच हनुमंत देखावा उभारण्यात येणार आहे. लव-कुश यांनी अश्वमेध यज्ञाचा  घोडा अडविल्यानंतर हनुमंत त्या ठिकाणी प्रकट झाल्याची कथा आहे. हे हनुमंताचे प्रकट होणे  देखाव्याद्वारे येथे साकारल्या जाणार आहे. देखवा स्थळाचे मंगळवार, 5 एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात आले. देखावा शुक्रवार, 8 एप्रिल रोजी पूर्ण होणार आहे. 



भूमिपूजन सोहळ्याला ब्रिजमोहन चितलांगे, विलास अनासने,  संदीप वाणी, बाळकृष्ण बिडवई, अनुप शर्मा, निलेश निनोरेे, अजय शर्मा, सागर शेगोकार, स्वानंद कोंडोलीकर, सतीश ढगे, वसंत बाछुका, डॉ. जुगल चिराणीया, विजयकुमार पनपालिया, कन्हैयालाल रंगवाणी, ब्रिजकिशोर दुबे, हरीश लाखाणी, मनीष बाछुका, अश्विनी सुजदेकर, सुमन गावंडे, पुष्पा वानखडे, सोनल ठक्कर, मनिषा भुसारी, सारीका देशमुख, कल्पना अडचुले , साधना येवले आदींसह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.




रामभक्तांनी शोभायात्रेत सहभागी व्हावे- आमदार शर्मा 





प्रभू श्रीराम हे प्रत्येक भारतीयांचे आराध्य आहे. श्रीराम नवमीनिमित्त अकोल्यात निघणारी शोभायात्रा रामभक्तीचे भव्य प्रकटीकरण करणारी असते. गत दोन वर्षे कोरोना आपत्तीमुळे शोभायात्रा निघू शकली नाही. प्रभू श्रीरामाच्या कृपाआशीवार्दाने कोरोना प्रादुर्भाव ओसरला असून, विश्व हिंदू परिषदेच्या संचालनात श्रीरामनवमी शोभायात्रेचे आयोजन केले आहे. प्रत्येक रामभक्ताने शोभायात्रेत सहभागी होऊन रामभक्तीचे विराट प्रकटीकरण करावे, असे आवाहन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. 



श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. 



यावेळी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष गजानन दाळू गुरुजी, अशोक गुप्ता,  रा. स्व. संघाचे प्रा. नरेद्र देशपांडे, गोपाल खंडेलवाल, विहिंपचे राहूल राठी, गणेश काळकर उपस्थित होते.




अकोल्यात निघणाऱ्या श्रीरामनवमी शोभायात्रेने आता उत्सवाचे स्वरुप धारण केले आहे. अकोल्यातील श्रीरामनवमी शोभायात्रेपासून अनेकांनी प्रेरणा घेऊन आपल्या गावांमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रा सुरू केली. गत 40 वर्षांपासून अखंडित निघणार्‍या शोभायात्रेला कोरोना काळात खंड पडला असला तरी पुन्हा त्याच उत्साहाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध देखावे, अश्व, श्रीराम दरबार रथ यासह निघणारी शोभायात्रा  ही श्रीराम नामाची अखंडित ऊर्जा देणारी ठरते. या शोभायात्रेत शहरातील सर्व धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील नागरिक, माता भगिनींनी दरवर्षीप्रमाणे सहभागी व्हावे, असे आग्रही प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. 




यावेळी सुनील पसारी, संदीप वाणी, प्रकाश लोढीया, प्रकाश घोगलिया, सूरज भगेवार, डॉ. प्रवीण चव्हाण, विलास अनासने, डॉ. अभय जैन, रमेश कोठारी, अनिल थानवी, संजय दुबे, हरिओम पांडे, संतोष पांडे, अक्षय गंगाखेडकर, अजय नवघरे, रुपेश शहा, गजानन घोंगे, संदीप निकम, सुनील कोरडिया, बाळकृष्ण बिडवई, पुरूषोत्तम गुप्ता, गजानन रेलकर, मनिष बाछुका, नवीन गुप्ता, आशिष भिमजियानी, प्रताप विरवाणी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या