world-women's-day-week-akola: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे जागतिक महिला दिन सप्ताह साजरा





ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन भिमनगर डाबकी रोड अकोला येथे गटस्तरावर 10 मार्च रोजी जागतिक महिला दिन सप्ताह अंतर्गत विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान कामगार व कामगार कुटुंबिय महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. 



कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैशाली  शेळके माजी उपमहापौर व नगर सेविका, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.वंदना शिंगणे दैनिक देशोन्नती उपसंपादक, अकोला, रंजना  विंचनकर नगर सेवीका. मंगला म्हैसने माजी नगर सेविका, विशेष उपस्थिती व प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैशाली नवघरे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त अकोला, बी.टी. भेले कल्याण निरीक्षक ललित कला भवन अकोला, यांच्या प्रमुख उपस्थितीत. कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी  वैशाली नवघरे प्रभारी सहाय्यक कल्याण आयुक्त अकोला यांनी आपल्या प्रास्ताविकातून मंडळाच्या विविध उपक्रमाबाबत महत्वपूर्ण उपस्थितांना माहिती दिली. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.





सत्कार मुर्ती म्हणून स्वाती गजानन काकड,तारा  आस्वले (कामगार कुटुंबिय),माधुरी राऊत ,आदिती  कुलकर्णी (कामगार) ,वंदना देशमुख, (कामगार) आदी कर्तुत्वान महिलांचा शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार कण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अजय पोरे केंद्र स़ंचालक यांनी केले. ‌



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ममता तिवारी,  गीता भेंडे, सविता पवार, अनुराधा ढीसाडे ,  शैलेश सूर्यवंशी, मनीष सरदार, मंगला महल्ले, मंदा उमाळे, शोभा गडम, जिजाबाई वराळे, संध्या मेश्राम, अनिता रेठे, किरण भोंगे, भारती बोबडे, मीना यादव,विद्या काळमेघ, मीना दाभाडे इत्यादींनी सहकार्य केले.



टिप्पण्या