- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जनता कर्फ्यू; संपूर्ण लॉकडाउनची रंगीततालीम
ॲड.अमोल इंगळे
स्वप्नातही विचार केला नव्हता 'कोरोना' नावाचा विषाणू आपल्या सुखी जीवनावर 'करणी' करेल. दोन वर्षापूर्वीची परिस्थितीच नवीन होती, आणि काय होतेय याबद्दल सगळेच अनभिज्ञ होते. सगळ्यांच्याच मनात एक अनामिक भीती होती आणि त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. थाळ्या, टाळ्या वाजवून आणि दिवे लावून नागरिकांनी मोदी यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला होता. या घटनेला आज, मंगळवारी दोन वर्ष पूर्ण झाले आहे.
बाजारपेठा बंद
अकोल्यात जनता कर्फ्यू दरम्यान संपूर्ण बाजारपेठ, भाजीबाजार, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. करोनाची धास्ती नवीन असल्याने नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजता नागरिकांनी आपापल्या ठिकाणी थाळ्या आणि घंटा वाजवाव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत नागरिकांनी आपापल्या घरांच्या गच्चीवर, गॅलरीत येऊन सहकुटुंब थाळ्या आणि घंटा वाजविल्या होत्या. अनेक उत्साही नागरिकांनी फटाकेदेखील फोडले होते.
प्रथमच अनुभवली इतकी शांतता
जनता कर्फ्यूदरम्यान संपूर्ण रहदारी बंद होती, रस्त्यावर वाहने नव्हती आणि एकही माणूस दिसत नव्हता. त्यामुळे, अकोला शहराच्या भागातील नागरिकांना कधी नव्हे इतकी शांतता त्या दिवशी अनुभवायला मिळाली. त्यानंतरच्या काळात मे महिन्याच्या मध्यापर्यंत काटेकोर लॉकडाउनचा कठीण काळही सर्वांनी अनुभवला.
लॉकडाऊन आणि कटू आठवणी
22 मार्च रोजी जनता कर्फ्यूला घटनेला आज, मंगळवारी दोन वर्ष पूर्ण होणार आहे. कडक लॉकडाउनच्या कटू आठवणी आजही थरकाप उडवून देतात.
(शब्दांकन आणि सर्व छायाचित्र - अमोल इंगळे)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा