- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
petrol-diesel-price-hike:congress: युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल भाव वाढीचा तीव्र निषेध; धिंग्रा चौकात दिले निदर्शने
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शहीद मदनलाल धिंग्रा चौकात निदर्शने देताना युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते.
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: दररोज वाढणाऱ्या पेट्रोल व डिझेल च्या भाववाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारने यावर तोडगा काढून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करीत आज अकोला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे व युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांचे नेतृत्वात मध्यवर्ती बस स्थानक जवळील शहीद मदनलाल धिंग्रा चौक येथे तिव्र आंदोलन करून केंद्र सरकार विरुद्ध नारेबाजी करण्यात आली.
सरकारी तेल कंपन्यांनी आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढविले आहे. गेल्या दहा दिवसांत नवव्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याची माहिती आहे. पेट्रोल डिझेल दरवाढमुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र सरकारला सामान्य नागरिकांच्या जीवन मरणाशी काहीही घेणे देणे नाही. केंद्र सरकारने यावर लवकर तोडगा काढावा, अन्यथा हे आंदोलन युवक काँगेस अधिक तीव्र करेल,अशी चेतावणी यावेळी आकाश कवडे यांनी दिली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान, फैजल खान, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश तायडे, विधानसभा अध्यक्ष मोहमंद शारीक, अमोल ठोकणे, जिल्हा महासचिव अक्षय देशमुख, कलीम शेख, शेख अब्दुला, अभिजीत तवर, सारंग शिंदे, तेजस देवबाले, मुकूंद सरनाईक, रवि खैरे, सम्राट ठाकरे, पंकज वाढवे, संदेश वानखडे, अजय ठोसर, अरशद खान, ऋषीकेश सनगाळे, संतोष झांझोटे, सतिश भुरटिया, सुरज भुरटिया, सोहम गवई, सागर अत्तरकर, रोहन पाही, संतोष निधाने, तौसीफ, शोहेल शेख, प्रदेश महासचिव अरमान जमा, अभिलाष तायडे, चेतन गुहकार, सचिन बडतकार, साजीद ईकबाल, शाहरुख खान, अलताफ खान, शुभम तिडके, मनिष तारे , बाबु खान, अरशद शेख, समीर खान, रविद्र तायडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा