court-news-akola-sport-coach-crime: प्रशिक्षणार्थी मुलीवर अत्याचार करणाऱ्या क्रीडा प्रशिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षा: अकोला क्रीडा क्षेत्राला काळीमा फासणारी घटना




नीलिमा शिंगणे - जगड

अकोला: एम आय डी सी पो. स्टे. येथे नोंदवण्यात आलेल्या एका गुन्ह्यात आरोपी शुद्धोधन सहदेव अंभोरे क्रीडा प्रशिक्षक याला अल्पवयीन मुलीचे वारंवार  शोषण करून तिला गर्भवती केल्या प्रकरणी विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) श्री. वी. डी.  पिंपळकर यांच्या न्यायालयात भा. द. वी. कलम 376 (2) (एन) व पॉक्सो कायदा कलम 3-4-5 मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व अन्य एका मुलीचा विनय भंग केल्या प्रकरणी भा. द. वी. कलम 354 मध्ये 5 वर्षे कारावासाची शिक्षा भा. द.वी. कलम 506 मध्ये 2 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली व विविध कलमा अंतर्गत एकूण रू 310000/- चा दंड ठोठावण्यात आला, आरोपी कडून दंड वसूल झाल्यास अर्धी रक्कम पिडीतेस देण्यात यावी असा आदेश झाला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्याची शिक्षा आरोपीस भोगावी लागेल. 



या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी हा अल्पवयीन क्रीडा प्रशिक्षणार्थी मुली सोबत शरीर संबंध करीत असे, तसे करू न दिल्यास टीम मधून काढून टाकण्याची धमकी देत असे. यामुळे नंतर  पीडिता गरोदर असल्याची बाब निदर्शनास आली. 30/07/2018 रोजी पीडितेने फिर्याद देऊन पोलिसांना याबाबत माहिती दिली. पिडीतेने दिलेल्या जबाब, साक्ष, अन्य एका पिडीतीने तिच्यावर सुद्धा याच आरोपीने विनयभंग केल्या बाबत दिलेली साक्ष, अन्य साक्ष पुरावे, D N A रिपोर्ट च्या आधारे आरोपी विरुद्ध असलेले आरोप सिद्ध झाले. या घटनेमुळे अकोला क्रीडा क्षेत्राला काळीमा फासला गेला. ही घटना उघडकीस आली होती, तेंव्हा अकोला जिल्ह्यात खळबळ माजली होती.



सरकार तर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले होते. पी. एस. आय. संजय कोरचे यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता मंगला पांडे व किरण खोत यांनी बाजू मांडली. एल पी सी अनुराधा महल्ले व सी एम एस चे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधीकारी म्हणून काम पाहिले.


टिप्पण्या